एमआयडीसी परीसरात घरफोडी, जबरी चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार मुद्देमालासह जालना येथुन जेरबंद.
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक-08/05/2023
*एक लाख रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त-एमआयडीसी पोलीसांची कामगिरी*
सविस्तर वृत्त असे की
दिनांक ३०/०४/२०२३ रोजी फिर्यादी नामे संगिता कचरु पालवे वय ३५ वर्ष धंदा घरकाम रा. चेतना कॉलनी नवनागापुर ता. जि. अहमदनगर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, दि. २९/०४/२०२३ रोजी सकाळी ०८/०० ते दिनांक ३०/०४/२०२३ रोजी सकाळी ०८/०० वा चे वा. दरम्यान शिवाजीनगर चेतना कॉलनी नवनागापुर येथे फिर्यादी यांचे घराचे समोर लावलेली ऑक्टीव्हा मोपेड गाडी नंबर एम एच १७ बी सी १८०० हि तसेच घराचे दरवाज्याचे लॉक तोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील सोन्याचे कानातील झुंबर तसेच लॉकेट असा एकुण ३३,०००/-रु एकुण मुददेमाल चोरुन नेला आहे. वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की. सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे १)गजानन उर्फ गजु विष्णु गवारे रा. बुटेगाव ता. बदनापुर जि. जालना २) ऋषिकेश नवाजी गांगर्डे रा. बुटेगाव ता. बदनापुर जि. जालना यांनी केला असुन ते जालना जिल्हयात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना मा. पोलीस अधीक्षक सो अहमदनगर यांचे आदेशाने जालना येथे पाठविले. सदर पोलीस पथकांनी बुटेगाव ता. बदनापुर जि. जालना येथून सदर आरोपींना सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) गजानन उर्फ गजु विष्णु गवारे वय ३१ वर्ष रा. बुटेगाव ता.बदनापुर जि.जालना २) ऋषिकेश नबाजी गांगर्डे वय २८ वर्ष रा. बुटेगाव ता. बदनापुर जि. जालना असे सांगीतले. सदर आरोपीनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडुन सदर गुन्हयात चोरी केलेली मोपेड गाडी नंबर एम एच १७ बी सी १८०० जप्त करण्यात आली आहे. व जालना येथुन चोरी केलेली स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. त्याबाबत जालना येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयातील चोरी गेलेले सोने हस्तगत करत आहोत. सदरचे आरोपी हे सराईत असुन त्यांचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे.
१) आरोपी नामे गजानन उर्फ गजु विष्णु गवारे वय ३१ वर्ष रा. बुटेगाव ता. बदनापुर जि. जालना याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) कदीम पोस्टे जालना गु रजि. नं. १९४/२०१७ भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे
२) निगडी पोस्टे गु रजि.नं. २६५/२०११ भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे. ३) तालुका पोस्टेजालना गु रजि.नं. १२९/२०१३ भादवि कलम ३९५ प्रमाणे.
४) तालुका पोस्टे जालना गुरजि.नं. १३५/२०१३ भादवि कलम ३९२.३४ प्रमाणे. ५) भोसरी पोस्टे गु रजि.नं. ३८२/२०१० भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे,
६) जवाहर नगर पोस्टे औरंगाबाद गु रजि.नं. ५७/२०१५ भादवि कलम ३७९ प्रमाणे.
७) एमआयडीसी पोस्टे पैठण गु रजि. नं. २९ / २०११ भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे. ८) जुन्नर पोस्टे गु रजिं, नंबर ५७/२०१० भादवि कलम ४३९, ३९२ प्रमाणे.
९) कदीम जालना पोस्टे गु रजि. नं. ९९/२०१५ भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे १०) चंदनझिरा पोस्टे जालना गु रजि.नं. २२९/२०१७ भादवि कलम ३७९ प्रमाणे.
(११) तालुका पोस्टे जालना गुरजि.नं. १२९/२०१५ भादवि कलम ३९५ प्रमाणे. १२) शिउर पोस्टे औरगांबाद गु रजि नं. १७/२०१९ भादवि कलम ३९४ प्रमाणे.
(१३) उस्मानपुरा पोस्टे औरंगाबाद गु रजि. नं. ७२/२०१० भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे. १४) एमआयडीसी पोस्टे, अहमदनगर गुरनं. ३८३/ २०२३ भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे
२) आरोपी नामे ऋषिकेश नबाजी गांगर्डे वय २८ वर्ष रा. बुटेगाव ता. बदनापुर जि. जालना हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) कदीम पोस्टे जालना गु रजि. नं. १९४ /२०१७ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे.
२) चंदनझिरा पोस्टे गु रजि. नंबर २२ / २०१७ भादवि कलम ३७९ प्रमाणे
३) आळंदी पोस्टे गु रजि. नंबर २३९ / २०२१ भादवि कलम ३०२ प्रमाणे. गु ४) एमआयडीसी पोस्टे, अहमदनगर गुरनं. ३८३ / २०२३ भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे
सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर, श्री. अजित पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सो. नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई राजेद्र गायकवाड, सफौ रावसाहेब लोखंडे, पोना आंधळे, पोकॉ किशोर जाधव, पोकों/सुरज देशमुख, पोकों सचिन हरदास तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे मपोना / १६५६ रिंकु मढेकर, पोकॉ/ ८९० प्रशांत राठोड, पोकॉ/ २४३५ नितीन शिंदे यांचे पथकाने केली आहे.