संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा दिनांक -06/05/2023
*भेंडा ग्रामपंचायत निवडणूक खर्च प्रकरण दोषीवर कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश*. नेवासा तालुक्यातील भेंडा बु ग्राम पंचायत. निवडणूक खर्च प्रकरणी
न्यायालयाच्या
संभाजीनगर खंडपीठाने अहमदनगर
जिल्हाधिकारी, प्रांत आणि जिल्हा
परिषदेला निवडणूक कामात हलगर्जी
आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांची
चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर तीन
महिन्यांत कारवाई करून अहवाल सादर
करण्याचे आदेश नुकतेच दिले.
सन २०१५ मध्ये भेंडा बुद्रुक
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा खर्च
उमेदवार लताबाई येडूभाऊ सोनवणे यांनी
वेळेत सादर केला नाही, म्हणून राजकीय
हेतूने आणि त्रास देण्याच्या उद्देशाने खोटा
तत्कालीन नेवासा
अहवाल
तहसीलदारांनी मार्च २०१७ मध्ये
जिल्हाधिकारी यांना दिला होता. परंतु,
सोनवणे यांनी वेळेत निवडणूक खर्च
सादर केला होता. असे असूनही चुकीचा
अहवाल सादर झाल्याने
जिल्हाधिकाऱ्यांनी सोनवणे यांना पाच
वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र
घोषित केले होते. या आदेशाविरुद्ध
सोनवणे यांनी नाशिक विभागीय आयुक्त
यांच्याकडे धाव घेऊन आपले म्हणणे
पुराव्यासह सादर केले. त्यात विभागीय
आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द
करून चुकीचा अहवाल देणाऱ्यांवर
कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी ४ वर्षात
कोणतीही कारवाई न केल्याने पुन्हा
सोनवणे यांनी २०२३ मध्ये दोषी
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत
संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल
केली. यात न्यायालयाने जिल्हाधिकारी,
उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा
परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे
याबाबत काय कारवाई केली, असे
विचारले? परंतु, कोणतीही कारवाई न
झाल्याने पुन्हा तीन महिन्यांत चौकशी
करून केलेल्या कारवाईचा
न्यायालयासमोर देण्याचे आदेश देण्यात
आले. लताबाई सोनवणे यांच्या वतीने
अॅड. प्रशांत डी. सूर्यवंशी आणि अॅड.
सुषमा जाधव-गंभीरे यांनी काम पाहिले.