गुन्हेगारी
Trending

विक्री करण्याचे उद्देशाने तीन (03) गावठी कट्टे व दोन (02) जिवंत काडतुसे सह दोन आरोपी 90,400/- रु. (नव्वद हजार चारशे) रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई

संतोष औताडे- मुख्य संपादक पीआरओ/प्रेसनोट/55/2023         दिनांक :-04/04/2023

—————————————————–
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, तपोवन रोड, अहमदनगर येथे तीन इसम गावठी बनावटीचे कट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने येणार आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/गणेश वारुळे, सफौ/राजेंद्र वाघ, सफौ/संजय खंडागळे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापु फोलाणे, संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, विशाल दळवी, भिमराज खर्से, पोकॉ/विनोद मासाळकर, योगेश सातपुते, चापोहेकॉ/ संभाजी कोतकर अशांनी मिळून वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने तपोवन रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे तीन संशयीत इसम पायी येतांना दिसले पथकाची खात्री होताच पथकाने दोन संशयीत इसमांना ताब्यात घेतले व एक इसम पळुन गेला. ताब्यात घेतलेल्या दोन इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) सागर एकनाथ आवसरे वय 26, रा. गाडेकर चौक, पत्राचाळ, निर्मलनगर, अहमदनगर व 2) मनोज लक्ष्मण झगरे, वय 31, रा. गुंडू गोडावुन मागे, तपोवन रोड, अहमदनगर असे असल्याचे सांगीतले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत तीन (03) गावठी बनावटीचे कट्टे व दोन (02) जिवंत काडतूस मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे. पळुन गेलेल्या इसमांचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.
ताब्यातील इसमाकडे गावठीकट्टे व काडतुसा बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल चौकशी करता त्यांनी सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने आणले असल्याचे सांगितले.
ताब्यातील आरोपीकडे तीन (03) गावठी कट्टे व दोन (02) जिवंत काडतूस असा एकुण 90,400/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर बाबत पोहेकॉ/440 संदीप कचरु पवार, ने. स्थागुशा, अहमदनगर यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 374/2023 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी नामे सागर एकनाथ आवसरे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन अहमदनगर येथे गंभीर दुखापत करणे व आर्म ऍ़क्ट असे गंभीर स्वरुपाचे एकुण -02 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. तोफखाना 127/2018 भादविक 324, 323, 504, 506, 34
2. तोफखाना 335/2018 आर्म ऍ़क्ट 3/25, 7
आरोपी नामे मनोज लक्ष्मण झगरे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन अहमदनगर येथे आर्म ऍ़क्ट प्रमाणे एक गुन्हा दाखल आहे तो खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. तोफखाना 126/2017 आर्म ऍ़क्ट 3/25, 7
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

 

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे