ब्रेकिंग
Trending

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या(LCB) पोलिस निरीक्षक पदी दिनेश आहेर यांची नियुक्ती.

संतोष औताडे -मुख्य संपादक ,नेवासा दिनांक -04/04/2023


 सविस्तर माहिती – अहमदनगर जिल्हा पोलीस दलात महत्वाची शाखा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) निरीक्षक पदी दिनेश आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने एलसीबीला एक ‘खमक्या’ अधिकारी मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी यापूर्वी बीड एलसीबी ची यशस्वी धुरा संभाळली आहे. त्यांच्या कामगिरी ची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांची नियुक्ती एलसीबी च्या निरीक्षक पदी केली आहे.

दरम्यान बदली होवूनही सोडले न गेलेले निरीक्षक अनिल कटके यांना आता सोडण्यात आले असून त्यांना आता नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यांना अजूनही ठेवले जाणार अशी चर्चा चांगलीच लागली होती, मात्र योग्य वेळ येताच राकेश ओला यांनी निरीक्षक अनिल कटके यांच्या जागी निरीक्षक दिनेश आहेर यांना संधी दिली आहे. त्यांच्या रूपाने एलसीबी ला ‘दबंग’ अधिकारी मिळाला आहे. अनिल कटके साहेब यांनी चांगल्याप्रकारे कार्यभार सांभाळला होता. अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची महत्वाची भूमिका बजावली होती.

दिनेश आहेर बीड एलसीबी च्या निरीक्षकपदी असताना त्यांनी नगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दीपक कोलते यांच्या खून प्रकरणातील आरोपी पिन्या कापसे याला पाठलाग करून पकडले होते. पिन्या कापसेने त्यावेळी निरीक्षक आहेर यांच्या पथकावर गोळीबार केला होता. याशिवाय अनेक उल्लेखनीय कामगिरी त्यांची असून त्यांच्या कामगिरीची दखल अधीक्षक ओला यांनी घेतली आहे
निरीक्षक आहेर यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाचे ‘सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक’ राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. बीड येथील तपासात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले आहे. निरीक्षक आहेर जिल्ह्यात बदलून आल्यानंतर त्यांनी सुरूवातीला बेलवंडी व नंतर सायबर पोलीस ठाण्याचा कारभारही यशस्वी संभाळला आहे. या नंतरच्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची महत्वाची भूमिका असते ती जबाबदारी दिनेश आहेर यांच्या वर सोपविण्यात आली असल्याचे या पुढील काळात त्यांच्या समोर मोठे आवाहन असनार आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे