वाहन चालकास चाकुने जखमी करुन 6,51,000/- रु किं कार, दोन मोबाईल फोन, घड्याळ व रोख रक्कम चोरी करणारे (03) तीन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

(संतोष औताडे -मुख्य संपादक नेवासा ) पीआरओ/प्रेसनोट /13/2023 दिनांक :- 16/01/2023
———————————————–
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 12/01/2023 रोजी फिर्यादी श्री. शिवाजी अभिमन्यु वाघमारे, वय 40, धंदा खाजगी नोकरी, रा. रत्नापुर, ता. कंळब, जिल्हा उस्मानाबाद हल्ली रा. कोंढवा, जिल्हा पुणे हे रिलायन्स डिजीटल, पिंपरी, पुणे येथे नोकरीस असुन त्यांचे सुट्टीचे दिवशी स्वत:चे वॉगनआर कारमधुन प्रवासी भाडे करता. दि.12/01/23 रोजी त्यांना पुणे ते औरंगाबाद असे प्रवासी भाडे मिळाल्याने त्यांनी पुणे येथुन औरंगाबाद पर्यत भाडे केले व त्यानंतर रात्री 10.30 वा. औरंगाबाद येथील बाबा पेट्रोलपंप येथे थांबुन एंजट मार्फत औरंगाबाद ते पिंपरी चिंचवडसाठी तीन प्रवाशा करीता भाडे बुक करुन दिले.
फिर्यादी औरंगाबाद-नगर मार्गे पिपंरी चिंचवडकडे जात असताना गाडीतील प्रवाशांनी पांढरीपुल येथे आल्यावर नातेवाईकांना फोन लावला व निवडुंगे येथुन आमचे आत्याला घेवुन परत पुणे येथे जायचे आहे असे सांगितले. निवडुंगे येथे आल्यावर रस्त्यावर गाडी थांबण्यास सांगुन तु आम्हाला शिव्या का दिल्या असे म्हणुन एका इसमाने फिर्यादीचे गळ्यात मफलर टाकुन ओढले व एका इसमाने चाकुने वार व मारहाण करुन जखमी केले व फिर्यादीची 6,51,000/- रु. किंमतीची वॉगनआर कार, दोन मोबाईल, घड्याळ, रोख रक्कम व कागदपत्रे जबरीने चोरुन घेवुन पळुन गेले आहे. सदर घटने बाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 30/2023 भादविक 394, 34 प्रमाणे अनोळखी इसमां विरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेश पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे, सफौ/मनोहर शेजवळ, राजेंद्र वाघ, पोहेकॉ/बाळासाहेब वेठेकर, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, भिमराज खर्से, दिपक शिंदे, पोकॉ/रविंद्र घुंगासे, सागर ससाणे व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या व पथकास लागलीच रवाना केले. पथकाने निवडुंगे, ता. पाथर्डी ते औरंगाबाद अशी पेट्रोलिंग करुन रस्त्यातील हॉटेल, पेट्रोलपंप व इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे तपास करत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी प्रसावतनगर, जिल्हा परभणी येथे असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्याबाबत तांत्रिक विश्लेषनाव्दारे खात्री करण्यात आली व पोनि/श्री. अनिलक कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी प्रसावतनगर, जिल्हा परभणी येथे जावुन संशयीतांचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन त्याचे राहते घरी सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसमा येताना पथकास दिसला पथकाची खात्री होतास त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव व गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) स्वप्नील शंकर सोनटक्के वय 23, रा. प्रसावतनगर, जिल्हा परभणी असे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्याने त्याचे इतर दोन साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचे दोन साथीदारांना त्यांचे दिले पत्यावर जावुन शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव व गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 2) भोला ऊर्फ टिकली ऊर्फ ओमकार सुनिल शिंदे वय 21 व 3) नारायण रमेश खुपसे वय 19 दोन्ही रा. प्रसावतनगर, जिल्हा परभणी असे असल्याचे सांगितले. सर्व आरोपींना गुन्ह्यात चोरीस गेलेले 22000/- रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन व एक घड्याळ असे मुद्देमालासह ताब्यात ताब्यात घेवुन पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.