ब्रेकिंग
Trending

अवैध व बेकायदेशिर वापरास व विक्रीस बंदी असलेला प्लास्टीक, नायलॉनचा धागा/चायना मांजा विरुध्द कारवाई करणे करीता माहिती कळविणे अहमदनगर जिल्हा पोलीस दलातर्फे अवाहन.

(संतोष औताडे -मुख्य संपादक नेवासा )क्रमांक पीआरओ/प्रेसनोट/11/2023                      दिनांक :- 12/01/2023
———————————————–
महाराष्ट्र राज्यात पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास इजा करणारा तसेच अवैध वफ
मकरसंक्राती निमित्ताने सर्व नागरीक मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा करतात. पतंग उत्सवावेळी बरेच नागरी व मुले महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वापरात बंदी असलेला प्लॉस्टीक, नायलॉन धागा/चायना मांजाचा वापर करतात. सदर मांजाचे वापरामुळे अधिक प्रमाणात अपघात होता. तसेच पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास इजा पोहचुन पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते.
प्लॉस्टीक, नायलॉन धागा, चायना मांजाचे अवैध घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, साठा करणारे व वितरण करणा-यांवर वेळीच आळा बसावा यासाठी अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे वतीने कडक कायदेशिर कारवाई करण्यात येत आहे. तसेच नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी या करीता शहरातील व गांवातील सार्वजनिक ठिकाणी दर्शनी भागावर बॅनर, पोस्टर्स लावुन जनतेस चायना मांजास बंदी असले बाबत अवगत करणे शाळा, महाविद्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे तसेच पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास इजा होवुन पर्यावरणाचा -हास होवु नये याकरीता शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यापुढे प्लास्टीक, नायलॉन धागा/चायना मांजाचा पतंग उत्सवा करीता वापर करणार नाही अशी शपत दिलेली आहे. अशा उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत.
याव्दारे अहमदनगर जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात जनतेस अवाहन करण्यात येते की, प्लॉस्टीक, नायलॉन धागा, चायना मांजा विक्रेत्याविरुध्द धडक कारवाई करणे सुरु असुन अवैधरित्या व बेकायदेशिपणे चायना मांजा घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, साठा करणारे व वितरण अशा ठिकाणांची व इसमांची माहिती पोलीस प्रशासनास द्यावी त्यांचेवर योग्यती कायदेशिर कारवाई करण्यात येईल. संबंधित माहिती देणा-या इसमाचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.
तरी अवैधरित्या व बेकायदेशिपणे चायना मांजाबाबत माहिती खाली दिलेल्या क्रमांकावर कळविण्यात यावी.
1) पोलीस मदत/डायल 112
2) पोलीस नियंत्रण कक्ष, अहमदनगर 0241 – 24161132/138
3) स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर 0241 – 2416111

 

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे