
(संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा) दिनांक- 04/01/2023
सविस्तर माहिती- माणुसकीचा ठेवा जपत भेंडा येथील आघाव परीवाराचा कौतुकास्पद उपक्रम श्री गाडगे महाराज आश्रमशाळेत आपल्या मुलीचा चौथा वाढदिवस साजरा केला. श्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नेवासा तालुक्यातील भेंडा येथील आघाव परिवाराने आपली मुलगी ज्ञानेश्वरी हिचा चौथा वाढदिवस भानसहिवरा येथील श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा येथे साजरा केला. सावित्रीबाई फुले यांनी जो संघर्ष केला तो जगाच्या कल्याणासाठी केला. त्यासाठी त्यांना खूप ञास सहन करावा लागला.चांगल्या कामाची सुरुवात कष्टातुनच होते असे गणेश महाराज चौधरी यांनी आपल्या भाषणात सांगितले. आघाव परिवाराने घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगितले जाते. या
कार्यक्रम प्रसंगी गणेश महाराज चौधरी, नागेशभाऊ आघाव, कृष्णा गव्हाणे (चेअरमन विठ्ठल अर्बन पतसंस्था), संतोष औताडे(पञकार), अंबादास आघाव, आण्णासाहेब दाणे, दत्ताभाऊ शिरसाठ (सरपंच ), रामचंद्र लाड साहेब, कचरु पालवे, श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा येथील सर्व शिक्षक कर्मचारी तसेच परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.