अहमदनगर येथील NH-61चा 331.17 कोटी रुपयांचा 3.08कि.मी 4 लेन एलेव्हेटेड स्ट्रक्चर उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न.

संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) दिनांक- 19/11/2022
सविस्तर माहिती-अहमदनगर शाहरतील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज नगर शहरातील शिल्पा गार्डन येथे देशाचे रस्ते व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. अहमदनगर शहर हे पुढील काळात देशाच्या नकाशावर मुख्य शहर म्हणून येणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं अनेक राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर शहराच्या जवळून जाणार असल्यामुळे अहमदनगर शहर हे उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे मुख्य शहर म्हणून ओळखले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 331.17 करोड रुपयांचा खर्च या उड्डाणपूलच्या कामास आला असून स्लीपरोड लेंथ 1120 मीटर आहे तसेच अॅव्हरेज स्पॅन 35 मीटरचे असुन 40/80 प्रतिस्पीड ने चालू शकतात. अहमदनगर पुणे रोड वरील सक्कर चौका पासून सुरू होणार असून औरंगाबाद रोड वरील अशोका हॉटेल पर्यंत 3.08 किलो मीटरचा हा पूल चार पदरी आहे.एकूण 85 खांबावर हा पूल उभारला गेला असून 8.50 मीटरचा अप आणि डाऊन चां रॅम्प आहे.
18 डिसेंबर 2020 रोजा पुलाच्या कामास सुरुवात झाली होती.दोन वर्षांच्या आत या पुलाचे काम पूर्ण झाले असून या पुलामुळे स्थानिक वाहतूक अबी राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक विभागली जाणार आहे.या वेळी भाषण करताना सुरवातीलाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खा. दिलीप गांधी यांच्या योगदानादसह खा.सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास रेखाटला जात असून त्यासाठी खासदार विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या निधीतून या कामास निधी उपलब्ध केला असल्याने या दोघांचे विशेष आभार मी मानतो असेही सांगितले. हा पूल सुंदर करण्याचा प्रयत्न दोघांनी केला आणि त्यामुळे राज्यात याचे अनुकरण नक्की केले जाईल असे मंत्री नितीन गडकरी सांगितले. या सोहळ्याला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,खा.सदाशिव लोखंडे,खा.सुजय विखे पाटील,आमदार बबनराव पाचपुते,आमदार मोनिका राजळे,आमदार राम शिंदे,आमदार संग्राम जगताप,माजी आमदार शिवाजी कर्डीले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,महापौर रोहिणी शेंडगे,भैय्या गंधे,सुवेंद्र गांधी,यांच्या उपस्थितीत पार पडला.