
संतोष औताडे (मुख्य संपादक- नेवासा) दिनांक-24/11/2022
अहमदनगर मधील मार्केटयार्ड परिसरात अवैधरित्या साठवलेला रेशनिंगचा तांदूळ पकडन्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.मार्केटयार्ड मध्ये असलेल्या ताराचंद हंसराज बोथरा या दुकानात अवैधरित्या रेशनिंगचा तांदूळ साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून पोलिसांनी हि कारवाई केली.या कारवाईत 160 गोण्या रेशनिंगचा तांदूळ आणि १ पिकअप गाडी व 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक बोथरा यांनाचौकशीसाठी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एकीकडे सरकार गोरगरिबांसाठी धान्य मोफत देत असताना हे धान्य गरिबांच्या पोटात न जाता धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन त्याची परस्पर विक्री होत आहे.अहमदनगर जिल्ह्यात रेशनच्या मालविक्रीचे रॅकेट फार मोठ्या प्रमाणात आहे . जिल्हा पुरवठा विभाग नेमका काय करतो असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.कि पुरवठा विभागाचे अधिकारी यात सामील असल्याची शंका सर्व सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.