ब्रेकिंग
Trending

ट्रॅक्टर चोरणा-या टोळीला श्रीरामपुर शहर पोलीसांनी केले जेरबंद

संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) दिनांक-13/10/2022


सविस्तर माहिती- श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी , जबरी चोरी , दरोडा असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणणेबाबत मा.पोलीस अधीक्षक , मनोज पाटील , मा . अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर , स्वाती भोर , तसेच मा . उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपुर उपविभाग संदिप मिटके यांनी मा.पोलीस निरीक्षक , श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन , हर्षवर्धन गवळी यांना सुचना दिल्या होत्या . त्यावरुन मा . पोलीस निरीक्षक यांनी श्रीरामपुर शहर तपास पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले . रघुनाथ नानासाहेब उघडे , रा . वडाळा महादेव , ता . श्रीरामपुर , जि . अहमदनगर यांचा ट्रॅक्टर हा त्यांचे राहते घरासमोरुन दि . २४/०६/२०२२ रोजी रात्री चोरीला गेला होता , त्यावेळी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि . नं . ५५४ / २०२२ भादवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे . सदर गुन्ह्याचा तपास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करीत असताना , पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी , यांना गोपणीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , सदर ट्रॅक्टर चोरणारी टोळी श्रीरामपुर परीसरात परत ट्रॅक्टर चोरीस येणार आहे . म्हणुन सदर बातमी मा . SDPO श्रीरामपुर यांना सांगुन , त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे तपास पथक रवाना करण्यात आले . बातमीप्रमाणे सापळा लावुन , शिताफिने यातील चार आरोपींना तपास पथकाने पकडले आहेत . त्यांना त्यांची ओळख विचारता त्यांनी त्यांचे नावे व पत्ते १ ) किरण शांताराम लासुरे , वय २५ वर्षे , रा . शिंगवे , ता . राहता , जि . अहमदनगर , २ ) प्रल्हाद गोरक्षनाथ बरवंट , वय ४५ वर्षे , रा . शिंगवे , ता . राहता , ३ ) रामा बाळासाहेब यादव , वय २ ९ वर्षे , रा . १४ नं . चारी , राहता . ता . राहता , ४ ) मच्छिंद्र भाऊसाहेब गायकवाड , वय २७ वर्षे , रा . बाबतारा , ता . वैजापुर , जि . औरंगाबाद असे असल्याचे सांगुन गुन्ह्याची कबुली दिली . त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करुन त्यांचे कडे तपास केला असता , त्यांचे कडुन दोन ट्रॅक्टर , ट्रॉली , आर्मीचर व चार मोबाईल असा एकुण १२ , ९ ०,००० / – इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून , नाशिक जिल्ह्यातील १ ) वावी पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . २२ ९ / २०२२ भादवि कलम ३७ ९ तसेच २ ) श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . ३८६ / २०२२ भादवि कलम ३७ ९ असे गुन्हे उघडकीस आणले आहेत . सदरची कारवाई मा . पोलीस अधीक्षक , मनोज पाटील साहेब , मा . अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर , स्वाती भोर , तसेच मा . उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपुर उपविभाग , संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली मा . पोलीस निरीक्षक , श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन , हर्षवर्धन गवळी यांचेकडील तपास पथकातील सपोनि जिवन बोरसे , पो.हे.कॉ. अतुल लोटके , पो.कॉ. गौतम लगड , पो.कॉ. राहुल नरवडे , पो.कॉ. रमिझराजा अत्तार , पो.कॉ. गणेश गावडे , पो.कॉ. गौरव दुर्गुळे , पो.कॉ. संपत बढे , पो.कॉ. मच्छिद्र कालखडे , पो.कॉ. भारत तमनर यांनी केली असुन , दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी सो यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जिवन बोरसे हे करीत आहेत .

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे