भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 49 वा गळीत हंगामाचा शुभारंभ.

संतोष औताडे (मुख्य संपादक- नेवासा) दिनांक-12/10/2022
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 49 वा गळीत हंगामाचा शुभारंभ आज करण्यात आला. ज्ञानेश्वर कारखाना परिसरात असलेल्या 214 गावातील सर्व ऊसाचे गाळप केले जाईल. त्याशिवाय ज्ञानेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम बंद केला जाणार नाही असे कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी सांगितले . त्याच बरोबर कारखान्यातील डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाचा विस्तार केला जाईल.तसेच नवीन इन्सनरेशन बॉयलरचे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले . चालू गळीत हंगामात ही सर्व कामे पूर्ण करून पुढीच्या वर्षीच्या 50 व्या गळीत हंगाम सकारात्मक विचारांची भूमिका घेऊन करायचा आहे असे मा.आ.नरेंद्र घुले पाटील यांनी सांगितले. या गळीत हंगाम प्रसंगी पुजा करणा-या व्याक्तींचा सन्मान पांडुरंग अभंग साहेब तसेच नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी मा.आ चंद्रशेखर घुले पाटील, पांडुरंग अभंग साहेब, अनिल शेवाळे साहेब, डॉ.शिवाजी शिंदे , विठ्ठलराव लंघे साहेब, त्याच बरोबर सर्व संचालक मंडळ, कर्मचारी,व परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे आभार तुकाराम मिसाळ यांनी मानले.