संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) दि .२४ / ० ९ /२०२२
अपहरण झालेल्या तरूणाची चोवीस तासांच्या आत सुटका ” शेवगाव पोलीसांची दमदार कामगिरी.
सविस्तर माहिती- शेवगाव तालुक्यातील अपहरण झालेल्या तरूणाची सुटकेचा करण्यात आली आहे. गुन्हा नं 672/2022 भादवि कलम363 नुसार22/09/2022 रोजी21-47 वा दाखल असुन नमुद गुन्ह्यातील फिर्यादी नामे लक्ष्मण भीमराव बोरूडे रा . शेकटे बा ता . शेवगाव यांनी फिर्याद दिली की , त्यांचे चुलते सोनाजी छबुराव बोरूडे वय ३० वर्षे हे शेवगाव ते गेवराई रोडवर साई कोटेक अॅण्ड जिनिंग जवळ बालमटाकळी शिवारात असताना त्यांना चार ते पाच आज्ञात इसमांनी बोलेरो जीप मध्ये जबरदस्तीने बसुन नेवून त्यांचे अपहरण केले आहे . अशा मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला होता . नमुद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून अपहरीत तरूणाचा शोध घेणे कामी आम्ही विलास पुजारी , पोलीस निरीक्षक शेवगाव पो.स्टे यांनी तात्काळ सपोनि अशिष शेळके , सफी बडधे , चापोना संभाजी धायतडक , पोकों राजेंद्र ढाकणे यांचे पथक तयार करून त्यांना तपास कामी रवाना केले . तपास पथकाने प्रथम गेवराई येथे शोध घेतला परंतु तेथे अपहरित तरूण मिळुन आला नाही . आज दिनांक २३ / ० ९ / २०२२ रोजी सकाळी ०७-३० वा . सुमारास आज्ञात आरोपींनी अपहरित तरूण सोनाजी छबुराव बोरूडे याचे चुलत भावाचे मोबाईल फोनवर फोन करून सोनाजी छबुराव बोरूडे यास फोनवर बोलण्यास भाग पाडुन चार – पाच लाख रूपये तयार ठेवा असे सांगीतले होते . आम्ही विलास पुजारी , पोलीस निरीक्षक शेवगाव पो.स्टे यांनी परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून सदरचे आज्ञात आरोपीचे मोबाईल फोनचे लोकेशन वरून तपास पथकास प्रथम जेजूरी भागात तपास करण्याचे सांगीतले व त्यानंतर मोबाईल लोकशन बदलल्याने तपास पथकास बारामती पोलीस स्टेशन हद्दीत सापळा लावण्यास सांगीतले त्यानुसार तपास पथकाने सापळा लावून १ ) भगवान प्रल्हाद ठोसर वय ३६ वर्ष रा . सिंदखेड ता . गेवराई जि.बीड २ ) केलास केरूजी धरंधरे वय ५० वर्षे रा . साठेनगर गेवराई ता . गेवराई जि.बीड ३ ) जिवन प्रकाश करांडे वय ३० वर्षे रा.सिंदखेड ता.गेवराई जि.बीड ४ ) बाळासाहेब भास्कर करांडे व य ५० वर्षे रा.मोटे गल्ली गेवराई ता . गेवराई जि.बीड ५ ) ज्ञानेश्वर भगवान कांबळे वय २७ वर्षे रा.साठेनगर गेवराई ता.गेवराई जि.बीड यांना अपहरित तरूण सोनाजी छबुराव बोरूडे याचेसह व त्यांनी वापरलेल्या बोलेरो जीप नं . MH – २३ E- ९ ७१३ हीचेसह शिताफीने ताब्यात घेतले आहे . सदर कामगिरी मा मनोज पाटील सो , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . सौरभ कुमार अगरवाल सो , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा.संदीप मिटके सो , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग चार्ज शेवगाव उपविभाग शेवगाव विलास एस . पुजारी पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अशिष शेळके , सफौ भगवान बडधे , पोकॉ राजेंद्र ढाकणे , चापोना संभाजी घायतडक यांनी केली आहे.