35 वर्षापुर्वी सैन्यदल अधिका-याच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक- 20 अॉगस्ट 2022
35 वर्षापुर्वीच्या सैन्यदल अधिका – याचा खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा लागलेला व मा . सर्वोच्च न्यायालय फरार आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
. प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की , सन १ ९ ८८ मध्ये अहमदनगर शहरातील तेलीखुंट हॉटेल जगदंबामध्ये सैन्य दलातील शिकाऊ अधिकारी नामे विनोद रावत व त्यांचे साथीदार असे हॉटेल जगदंबा येथे येवुन किरकोळ कारणावरुन हॉटेल मालक श्री . भगवान गंगेकर यांचेशी वाद घालु लागले . त्यावेळी त्यांचा पुतण्या राजु अंबादास गंगेकर व अनिल तुकाराम गंगेकर यांनी वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केली . सदर घटनेचा राग मनात धरुन सैन्य दलातील शिकाऊ अधिकारी नामे विनोद रावत व त्यांचे साथीदार यांनी हॉटेल जगदंबा , तेलीखुंट , अहमदनगर या ठिकाणी येवुन हल्ला केला त्यावेळी राजु अंबादास गंगेकर व अनिल तुकाराम गंगकर यांनी सैन दलातील अधिकारी व त्यांचे साथीदार यांचा पाठलाग व मारहाण केली . व राजु गंगेकर यांने जवळील गुप्तीने विनोद रावत यांचे पोटात भोसकुन जखमी केले . सदर घटने बाबत सिटी कोतवाली ) पोलीस स्टेशन गु.र.नं. १६८ / १ ९ भादविक ३०७ , प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . यातील जखमी विनोद रावत याचा उपचारा दरम्यान हॉस्पीटल येथे मृत्यु झाल्याने सदर गुन्ह्यास भादविक ३०२ हे वाढीव कलम लावण्यात आले होते . सदर गुन्ह्याचा सखोल व कारकाईने तपास करुन मुदतीत मा . सत्र न्यायालय , अहमदनगर येथे आरोपी विरुध्द दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते . मा . न्यायालयात नियमित सुनावणी होवुन आरोपींना मा . सत्र न्यायालय , अहमदनगर यांनी निर्दोष मुक्त केले होते . त्या बाबत मा . उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद येथे अपील करण्यात आले होते . मा . उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे नियमित सुनावणी होऊन गुन्ह्यातील आरोपी नामे राजु अंबादास गंगेकर यास भादविक ३०२ अन्वये मा . सत्र न्यायालय अहमदनगर यांनी निर्दोष मुक्त केलेला आरोपीस दोषी ठरवुन पाच ( ०५ ) वर्षे शिक्षा दिली होती . मा . उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी पाच वर्षे दिलेल्या शिक्षे विरुध्द आरोपींने मा . सर्वोच्च न्यायालय , दिल्ली येथे अपिल केले होते . सदर अपिलामध्ये मा . सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम केली मा . सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा कायम केलेला आरोपी नामे राजु अंबादास गंगेकर , रा . तवले नगर , अहमदनगर हा शिक्षा सुनावले पासुन ( सन २०१ ९ पासुन ) फरार झाला होता . त्याचा शोध घेवुन अटक करणे करीता मा . सत्र न्यायालयाचे वॉरंट स्थानिक गुन्हे शाखेस प्राप्त झाले होते . सदर वॉरंटची तात्काळ बजावणी करणे बाबत मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि / श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून कारवाई करणे बाबतचे आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये पोनि / श्री . अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि / गणेश इंगळे , सफौ / राजेंद्र वाघ , संजय खंडागळे , मनोहर शेजवळ , पोहेकॉ / देवेंद्र शेलार यांनी सदर कामगिरी केली ,राजु अंबादास गंगेकर , वय ५५ , रा . तवले नगर , नगर औरंगाबाद रोड अहमदनगर असे असल्याचे सांगितले . नमुद संशयीत इसम हा वर नमुद गुन्ह्यात मा . सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा कायम केलेला आरोपी असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेवून पुढील कायदेशिर कारवाईसाठी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे . सदर कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अगरवाल साहेब , अपर पोलीस अधिक्षक , अहमदनगर व श्री . अनिल कातकाडे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .