संतोष औताडे ( मुख्य संपादक ) दिनांक – 07/07/2022
रस्तालूट करणारे दरोडेखोर सिनेस्टाईल पध्दतीने जेरबंद नेवासा पोलिसांची कामगिरी.
सविस्तर माहिती- दिनांक 07/07/2022 रोजी रात्री गस्ती करीता पोनि विजय करे . पोना बबन तमनर , पोको अंबादास गिते पोको नारायण डमाळे पोकाॅ दिलप कु – हाड़े असे सर्वांनी औरंगाबाद ते अहमदनगर रोडवर वाहने आडवून रोड रॉबरी करणारे चोरांना पकडण्यासाठी सापळा लावून औरंगाबाद ते अहमदनगर या महामार्गावरुन फिरत असताना , त्यावेळी एक महिंद्रा पिकअप गाड़ी होमधील पाचजण यांनी माळीचिंचोरा फाटा येथे मालवाहतूक ट्रक वाहन ने एमएच 16 ए वाय 7254 होचा रॉड तुटल्याने गाडी रोडचे बाजूला लावून लावून उभा होता तेका नेवासा पोलीस ठाण्याची नाईट राउंडची गाडी तेथे गेली असता त्यास रात्री काही अडचण आल्यास त्यास संपर्क करण्यासाठी नेवासा पो स्टेचे पोलीस अंमलदार यांचा नंबर देण्यात आला होता त्यांनतर पहाटे ठिक 03.30 वाचे दरम्यान नमुद ट्रक मधील चालक हा माळीचिचोंरा फाटा येथे गाडीतील ड्रायव्हर याने गाडीच्या दोन्ही काचा बंद करून झोपलेला असताना त्याचे गाडीच्या दोन्ही काचा फोडून व लॉक तोडून दोन इसम यात आले तेव्हा गाडीत डावे बाजूने आत आलेल्या इसमाने ड्रायव्हर यास पैसे दे नाही तर तुला कोयत्याने मारतो असे म्हणून कोयता पुढे केला तेव्हा त्याचे अंगात काळे रंगाचे जकींग होते तेव्हा उजव्या बाजूने आत आलेल्या इसमाने चालक पास कोयताने मारले असता चालक याने हात पाठीमागे केल्याने त्यास कोयता निसटता लागला तेव्हा दोघांनी त्यास मारहाण करून त्याचे खिशातील पाकीटातील 8,000 / – रूपये काढून घेतले व रिकामे पाकोट गाडीत फेकून दिले व ते बाजूस उभा असलेल्या पिकअप मध्ये बसून निघून गेले तेव्हा चालकाने पाहिले असता सदर महींद्रा पिकअप मध्ये आणखी तीन जण बसलेले होते तेव्हा चालक याने नेवासा पोलीसांनी संपकांसाठी दिलेल्या मोबाईल फोनवर संपर्क केला असता तेथे रात्रीगस्त करत असताना पोनि विजय करे , पोना बबन तमनर , पोको अंबादास गिते . पोको नारायण डमाळे चा .पोकां दिलप कु – हाडे असे रात्रीगस्तचे पोलीस अधिकारी व कर्मचारी असे सदर ट्रक चालक यास सोबत घेवून त्यास लुटणारे पिकअप व इसम यांचा शोध घेत असता नेवासा फाटा येथे चालक याने त्यास लुटणारे इसम व त्याचे कडील पिकअप गाडी ओळखली असता तेथे आम्ही पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सदर चालक असे आम्ही नमूद पिकअप जवळ गेलो असता पोलीसांना पाहून काळया रंगाचे जकेट घातलेले तिन इसम अंधाराचा फायदा घेवून शेतात पळून गेले व दोन इसम यांनी पिकअप गाडी घेवून पळ काढला त्यांनतर आम्ही पोलीसांनी त्याचा पाठलाग सूरू केला तेव्हा झाले प्रकाराबाबत पोसई समाधान भाटेवाल सो पोना राजू केदार पोको बाळू खेडकर , पोकों योगश आव्हाड , पोकों शाम गुंजाळ LCB चे पाहेकों दत्तात्रय गव्हाणे पोको ज्ञानेश्वर शिंदे असे नेवासा फाटा येथे आले व त्यांनतर सर्व पोलीस स्टाफ यांनी त्याचा अ नगर ते औरंगाबाद रोडवर 40 ते 50 किलोमिटर पाठलाग केला असता ह्युंदाई शोरूम समोर त्याचे कडील पिकअप गाडी पकडली असता त्यात कोयता दाखवून पाकटातील पैसे काढणारा इसम व त्याचे सोबत अनोळखी एक इसम मिळाला तेव्हा पो नि श्री करे सो यांनी त्यास त्याचे नाव गाव विचारता पाकीट काढणारे इसमाने त्याचे नाव त्रूतीक संजय जाधव व दुस – याने दिपक उर्फ कटटा बाळासाहेब काळे दोघे रा देहरे ता नगर जि अ नगर असे असल्याचे सांगितले त्यांनतर पोलीसांनी त्यांची महींद्रा पिकअप नं एमएच 20 डीई 2337 ची झडती घेतली असता त्याचे गाडीत ट्रक चालक यास दाखवण्यात आलेला कोयत्या सारखे हत्यार व दोन मोबाईल मिळून आले तेव्हा त्या दोन्ही इसमांना तसेच त्याचे कडील गाडी हत्यारासह ताब्यात घेवून पो स्टेला आलो व वरील पाच इसम याचे विरूध्द कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पोउपनि श्री . समाधान भाटेवाल हे करीत आहेत . सदरची कारवाई ही मा . पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सो अहमदनगर , मा . अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर श्रीरामपुर मा . उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे उपविभाग शेवगांव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री . विजय मा करे पोलीस निरीक्षक श्री समाधान भाटेवाल , पोना / बबन तमनर , पोना राजू केदार , पोको अंबादास गित पोको नारायण डमाळे , चापोकों दिलीप कु – हाडे , पोकॉ बाळू खेडकर पोको योगेश आव्हाड पोको शाम गुंजाळ सर्व नेमणुक पोलीस ठाणे नेवासा व स्थानिक गुन्हे शाखा याकडील पोहेकों दत्तात्रय गव्हाणे पोको ज्ञानेश्वर शिंदे यांनी संयुक्तपणे केली आहे .