ब्रेकिंग
Trending

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती अभियान रॅली. डॉ. बी.जी शेखर साहेब व पद्मश्री पोपटराव पवार यांची उपस्थिती

संतोष औताडे ( मुख्य संपादक ) दिनांक- 06/07/2022


जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान रॅली. डॉ. बी.जी शेखर साहेब व पद्मश्री पोपटराव पवार यांची उपस्थिती·


 

सविस्तर माहिती-जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अहमदनगर पोलिस दलाच्या वतीने जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते.तोफखाना पोलिस स्टेशन पासुन प्रोफेसर चौक ते माऊली संकुल अशी रॅली काढण्यात आली होती.या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती पोस्टर, बॅनर, माहिती पञिका यांचे वाटप करण्यात आले.यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयातील आंतरवसिता विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमाच्या ·अध्यक्षस्थानी बी जी शेखर साहेब हे होते.त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की व्यसना पासून दूर राहायचे असेल तर आयुष्यात आपले मित्र कोण व कसे आहेत हे फार महत्त्वाचे आहे.संगत ही आपल्या आयुष्यात फार महत्त्वाची आहे.फक्त मुलांना दोष देऊन उपयोग नाही तर पालकांनी सुध्दा आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. नवीन पीढी व्यसनाधीन झाली आहे त्यांना त्या दुर दुर ठेवण्यासाठी पोलिस मदत करतील. विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल यशाच्या शिखरावर पोहचावे ही पोलिसांची भूमिका आहे.या वेळी पद्मश्री पोपटराव पवार –यांनी सांगितले की मुक्तांगण सामाजिक संस्थेने 27आॅगस्ट 1986 रोजी प्रथम व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली.मी कोणतेही व्यसन करणार नाही असे म्हणुन चालत नाही तर ती भावना अंर्तरमनातून असली पाहिजे.आपण आपल्या आयुष्यात काय गमावले असेल तर ते आहे माती आणि पाणी असेही त्यांनी सांगितले.तरूण पिढीने आपले आदर्श कोण असले पाहिजे हे शालेय जीवनापासून ठरवले पाहिजे.या वेळी त्यांनी अहमदनगर जिल्हा पोलिस दलाचे अभिनंदन केले.खाकी वर्दी ने ठरवलं तर समाजात बदल घडवून आणायला वेळ लागणार नाही. खरं पाहिलं तर आपल्या ला सिमेवर जास्त धोका नाही तर गावातुन,शहरातुन आहे.आयुष्यात व्यसन असावं पण ते वाचनाचे,खेळाचे, लिखाणाचं असेही पोपटराव पवार यांनी सांगितले.या कार्यक्रमात परीहार व्यसनमुक्ती केंद्र, मनोबल व्यसनमुक्ती केंद्र, सुर्योदय व्यसनमुक्ती केंद्र तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या जनजागृती अभियान प्रसंगी बी जी शेखर साहेब विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेञ, पद्मश्री पोपटराव पवार, मा. मनोज पाटील साहेब पोलिस अधीक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, अनिल कटके साहेब स्थानिक गुन्हे शाखा, डॉ.दिप्ती करंदीकर मानसोपचारतज्ञ, डॉ हर्षल पटारे, भारतकुमार उदावंत, मधुकरराव कळे, ज्योती गडकरी मॅडम तोफखाना पो.स्टे, राजेंद्र सानप शहर पो.स्टे, डॉ.गिरिश कुलकर्णी, अजित पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी, पञकार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची अध्यक्षीय सुचना मा.अनिल कातकडे साहेब यांनी मांडली. तर आभारप्रदर्शन मा.मनोज पाटील साहेब पोलिस अधीक्षक यांनी मांडले.या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक विद्यार्थी पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे