संतोष औताडे (मुख्य संपादक ) दिनांक- 03/07/2022
संघ भावना ठेवल्यास महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचा विजय निश्चित- प्रा. शशिकांत गाडे
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील
भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील जिजामाता शास्ञ व कला महाविद्यालयात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी
महाराष्ट्र संघाच्या निवड चाचणी शिबीराचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 2 जुलै 2022 रोजी पार पडला. वरिष्ठ पुरुष गट संघ निवड शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन मुंबई यांच्या सहकार्याने अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि जिजामाता शास्त्र कला महाविद्यालय ज्ञानेश्वर नगर आयोजित 69 वे महाराष्ट्र राज्य पुरुष गट संघ निवड शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन चे उपाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग हे होते . यावेळी बोलताना प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी सांगितले नगर जिल्ह्याचा संघ सांघिक भावनेने खेळल्यामुळेच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विजयी झाला होता आणि महाराष्ट्राच्या कबड्डीच्या इतिहासात अहमदनगर जिल्ह्याने प्रथमच विजय मिळवला आहे. यामध्ये खेळाडूची संघ भावना आणि चिकाटी या दोन गोष्टीमुळे हे शक्य झाले त्यामुळे नगर जिल्ह्याच्या खेळाडूंचा विश्वास वाढला म्हणून मी राज्य कबड्डी असोसिएशनला शिबिर आयोजन करण्याची संधी आमच्या जिल्ह्याला द्या ही मागणी केली. त्यांनी आमची मागणी मान्य केली त्यामुळे श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाला हे शिबिर आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. या शिबिरासाठी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख माजी आमदार नरेंद्र घुले पाटील साहेब माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील साहेब कारखान्याचे उपाध्यक्ष मा.आमदार पांडुरंग अभंग साहेब व शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ, या सर्वांचे हे शिबिर आयोजित केल्याबद्दल आभार मानले.भेंडा येथील मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्त्र कला महाविद्यालयात राज्य कबड्डी असोसिएशन ने अशा प्रकारचे शिबिर भरण्याची संधी दिली आणि ते शिबिर आम्ही यशस्वी करू , तुम्ही सर्व खेळाडूंनी एकजुटीने सराव करून खेळून महाराष्ट्राचा कबड्डी संघ नक्कीच विजय होईल अशा शुभेच्छा माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी अध्यक्षपदावरून बोलताना दिल्या
यावेळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे. जिजामाता महाविद्यालयाचा विद्यार्थी श्री शंकर गदई यास महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन यांच्याकडून दिला जाणारा या वर्षाचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्याचाही सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते झाला. भेंडा येथील रणवीर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सोपान महापूर, बंडू भागवत, परसराम नाकाडे, सोपान काळे, संतोष औताडे (पञकार) त्याचबरोबर मंडळाचे सर्व सदस्य हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे .
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर आर सासवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व शिबिरार्थींना कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही शिक्षण संस्था आमच्या मागे खंबीरपणे उभी आहे त्यामुळे ग्रामीण भागात अशी संधी पहिल्यांदाच आमच्या महाविद्यालयात मिळत असल्यामुळे त्यांनी राज्य कबड्डी असोसिएशनचे आभार वक्त केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक दत्ता वाकचौरे यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर संभाजी काळे यांनी केले. कार्यक्रमास अहमदनगर कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष जयंत वाघ, खजिनदार प्रकाश बोरुडे सह सेक्रेटरी विजय मिस्कीन, अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाचे कबड्डीचे मार्गदर्शक खुरंगे साहेब,शंतनू पांडव, तसेच श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री काकासाहेब शिंदे ,श्रीअशोकराव मिसाळ, श्री शिवाजीराव कोलते, कारखान्याचे सेक्रेटरी रवींद्र मोटे, लोखंडे साहेब , श्याम सुंदर कौशिक, शिवाजीराव शिंदे, गणेशराव गव्हाणे , नामदेवराव निकम, संभाजी काळे प्राचार्य सोपान काळे शिवाजी वाबळे, फिटनेस कोच पुरूषोत्तम प्रभु , पञकार दिलदार शेख, बंडु घोडेचोर, रघुनाथ मोरकर इ. उपस्थित होते
हे शिबिर 1 जुलै ते 15 जुलै या कालावधीत संपन्न होणार आहे या शिबिरामध्ये 11 प्रो. कबड्डी लीग मधील विविध संघात खेळलेले आहेत .या शिबिरासाठी सहभागी झालेले खेळाडू पुढील प्रमाणेअहमदनगर जिल्हा 5 मुंबई शहर 4 ,मुंबई उपनगर 3 ,ठाणे जिल्हा 3 ,रायगड जिल्हा 1 ,रत्नागिरी जिल्हा 2, पुणे जिल्हा 2 ,अहमदनगर जिल्हा 5, सांगली जिल्हा 1 ,नाशिक जिल्हा 1 ,धुळे जिल्हा 2 बीड जिल्हा 1 जालना 1 नांदेड जिल्हा 2 नंदुरबार जिल्हा 1 एकूण निवड झालेल्या पैकी 28 खेळाडू या शिबिरामध्ये सहभागी झालेले आहे या शिबिराचे मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ने माननीय प्रशांत चव्हाण एअर इंडिया यांची मुख्य मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे . तसेच या संघाचे संघव्यवस्थापक म्हणून आयुब पठाण हे काम पाहत आहे
या शिबिरातून बारा खेळाडूंचा संघ निवडून दिनांक 21 जुलै ते 25 जुलै या कालावधीत चरकी दादरी हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे दिनांक 7 जुलै 2022 रोजी निवड समिती राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राचा संघाची निवड करणार आहे, व निवड झालेल्या खेळाडूंची नऊ दिवसाचे शिबिरही ज्ञानेश्वर नगर येथील जिजामाता महाविद्यालयात होणार आहे व या ठिकाणाहून हा संघ हरियाणा येथील राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे. अशा प्रकारचे शिबिर नगर जिल्ह्यात तसेच भेंडे सारख्या ग्रामीण भागात आयोजित केल्यामुळे जिल्ह्यातील व तालुक्यातील कबड्डी प्रेमी, नागरिक, कबड्डी खेळाडू विद्यार्थी , कबड्डी मध्ये नावाजलेल्या महाराष्ट्रातील कबड्डी खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 6 ते 9 या वेळेत महाविद्यालयात येऊन त्यांचा खेळ बघण्याचा आनंद लुटत आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे सचिव मा. अनिलराव शेवाळे साहेब मार्गदर्शनाखाली जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयाचे माजी खेळाडू सर्व विद्यार्थी रणवीर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य प्रयत्न करीत आहे.