अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन दोन महिने फरार असलेले सराईत दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई

संतोष औताडे- मुख्य संपादक, दिनांक-11/06/2023
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक ०७/०४/२३ रोजी दुरगांव, ता. कर्जत येथील पिडीत अल्पवयीन मुलगी स्वयंपाक घरात काम करत असताना आरोपी नामे राजु शेख व अजीज शेख यांनी पाणी पिण्याचा बहाणा करुन घरात प्रवेश करून पिडीत मुलीचे दोन्ही हात बांधुन तोंडात रुमाल कोंबुन तिचे इच्छे विरुध्द जबरीने संभोग केला व सदर घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझी आई व भावाला मारुन टाकीन अशी धमकी दिली होती. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. २२९/ २०२३ भादविक ३७६, ३७६ (ड), ४५२, ५०६ बा.ले.अ.सं.अ.क. ३, ४, ५ (ग), ६ सह अजाजक ३ (१) (आर) ३ (२) (व्ही) प्रमाणे आरोपी विरुध्द पोक्सो कलमान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर यांनी घटना ठिकाणास समक्ष भेट देवुन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन फरार आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव ,पोलीस हेडकॉन्स्टेबल बन मखरे, अतुल लोटके, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशा प्रमाणे पथक माहिती घेत असताना पथकास गुन्ह्यातील आरोपी वारंवार वास्तव्याची ठिकाणे बदलुन औरंगाबाद, उस्मानाबाद व पुणे असे जागा बदलुन राहतात अशी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने आरोपींचा पुणे जिल्ह्यात तपास करता असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की, दुरगांव, ता. कर्जत येथील बलात्काराचे गुन्ह्यातील दोन आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवुन केडगांव चौफुला, ता. दौंड, जिल्हा पुणे येथील खुडगांव शिवारात एका झोपडीमध्ये राहतात आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवून खात्री करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व लागलीच पथकास रवाना केले. पथकाने केडगांव चौफुला, ता. दौंड, जिल्हा पुणे परिसरात जावुन दोन दिवस वास्तव्य करुन शेतकरी व शेत मजुर असे वेशांतर करुन खुडगांव शिवारात आरोपी राहत असलेल्या झोपडी जवळ जावुन पाहणी केली असता बातमीतील वर्णना प्रमाणे दोन इसम बसलेले दिसले. पथकाची खात्री होताच झोपडीत अचानक प्रवेश
करुन दोन संशयीत इसमांना जागीच ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीत इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव १) राजु समशुद्दीन शेख वय ३१ व २) अजीज समशुद्दीन शेख वय २८ दोन्ही रा. थोटेवाडी, दुरगांव, ता. कर्जत असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग, कर्जत हे करीत आहे.
आरोपी नामे राजु समशुद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द कर्जत पोलीस स्टेशन येथे अजाज व भादविक कलमान्वये दोन गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे- पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम अ.क्र.
गु.र.नं. ११३/ २०२३ भादविक ५०४, ५०६ सह अजाजअ क. ३ (१), (आर) (एस), ३ (२) (व्हीए)
कर्जत गु.र.नं. २०२ / २०२३ भादविक ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४आरोपी नामे अजीज समशुद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द कर्जत स्टेशन येथे अज वभादवि कलमान्वये दोन गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे-
कर्जत गु.र.नं. ११३/ २०२३ भादविक ५०४, ५०६ सह अजाजअ क. ३ (१),
(आर) (एस), ३ (२) (व्हीए) कर्जत गु.र.नं. २०२ / २०२३ भादविक ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व मा. श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.