शिर्डी मंदिर परिसरात अल्पवयीन मुलांना भिक्षा मागायला लावणा-या पालकांवर पोलिसांची कारवाई
संतोष औताडे-मुख्य संपादक नेवासा दिनांक-12/09/2025
शिर्डी मंदिर परिसरात अल्पवयीन मुलांना भिक्षा मागायला लावणा-या पालकांवर पोलिसांची कारवाई . सविस्तर माहिती- शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत श्री साई बाबा मंदिर असून जागतिक किर्तीचे देवस्थान असल्याने सदर
ठिकाणी दररोज भारतातील वेगवेगळ्या राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे श्री साई
बाबा मंदिर परिसरात बरेच लोक फोटो विक्री, मुर्ती विक्री, फुले -हार प्रसाद विक्री, गंध लावणे इत्यादी
व्यवसाय करतात व त्यावर अर्थार्जन करतात. याशिवाय काही पालक मात्र जाणीवपुर्वक आपल्या अल्पवयीन
मुलांना आर्थिक प्राप्तीसाठी मंदिर परिसरात भिक्षा मागणे, फोटो विक्री, मुर्ती विक्री, फुले-हार-प्रसाद विक्री,
गंध लावणे आदि कामे करण्यास भाग पाडतात.
बालकांना त्यांचे पालक हे अनावश्यक शारीरिक व मानसिक कष्ट देवून जाणीवपुर्वक त्यांना
उघड्यावर सोडून त्यांचेकडे दुर्लक्ष करत आहेत, बालकांचे वय पाहता त्यांना चांगल्या पध्दतीचे शिक्षण देणे
गरजेचे आहे परंतु, ते मुले मुली शाळेत न जाता वरीलप्रमाणे कामे करताना दिसून येत आहेत. बालकांची
काळजी व संरक्षणाची जबाबदारी ही त्यांची पालकांची असून बालकांच्या सर्वोत्तम विकासविषयक गरजा
पुरविण्याकरिता आणि बालकांच्या सर्वोत्तम हिताच्या व्यवस्थेसाठी त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन
करण्याकरिता बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारीत २०२१ चे कलम २ (१४)
अन्वये सदरचे बालके हे काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालके आहेत असे दिसून येत असल्याने
त्यांना संरक्षण व काळजी मिळावी त्यांचे पुनर्वसन होवून सर्वोत्तम हित साधले जावे यासाठी दि.११/०९/२०२५
रोजी मोहीम राबविण्यात आली असून सदर मोहिमेमध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेले १२ बालके (
१० मुले ०२ मुली ) आढळून आलेले आहेत.
वरील मिळून आलेले बालकांचे पालक हे त्यांच्या पाल्याला क्रूर वागणुक देवून त्यांच्याकडून भिक्षा
मागविणे, प्रसाद फुल हार विक्री करणे, गंध लावणे इत्यादी कामे करवून बालकांना अनावश्यक शारीरिक व
मानसिक कष्ट देवून जाणीवपुर्वक त्यांना उघड्यावर सोडून त्यांचेकडे दुर्लक्ष करताना मिळून आले आहेत
म्हणून सदर पालकांविरुध्द शिर्डी पोस्टे गुरनं ८८३ / २०२५ बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण )
अधिनियम २०१५ सुधारीत २०२१ चे कलम ७५, ७६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरच्या
बालकांना मा.अध्यक्ष, बाल कल्याण समिती अहिल्यानगर यांचे आदेशान्वये श्रीरामपुर व संगमनेर येथील
बाल निरीक्षण गृहात दाखल करण्यात आले आहे.
सदर कारवाई ही श्री. सोमनाथ घार्गे, मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर
पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली
रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन, पोउनि निवांत जाधव, पोउनि सागर काळे, पोहेकॉ
संदीप उदावंत, पोहेकॉ पंकज गोसावी, पोकॉ केवलसिंग राजपुत, पोना किरण माळी, पोना गजानन गायकवाड,
पोकॉ विजय धनेधर, पोकॉ सोमेश गरदास, मपोकॉ घोनशेटवाड तसेच महिला व बाल विकास विभागाकडील
योगीराज अशोक जाधव परिविक्षा अधिकारी, गिरीधर चौरे संरक्षण अधिकारी व इतर स्टाफ असे सहभागी
होते.
याद्वारे आवाहान करण्यात येते की, कोणत्याही पालकांनी त्यांचे पाल्यांना (बालकांना) असे
गैरकृत्य करण्यास भाग पाडू नये अन्यथा सदर पालकांवर नमूद कायद्यान्वये कारवाई करून गुन्हे नोंद
करण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे.