अवैध दारु विक्रेते, मटका जुगार खेळविणारे तसेच गांजा पिणारे ईसमांवर गुन्हे दाखल नेवासा पोलिसांची कारवाई.
संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा. दिनांक -26/03/2025
नेवासा पोलीसांची नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारु विक्रेते, मटका जुगार खेळविणारे
तसेच गांजा पिणारे ईसमांवर छापेमारी करुन गुन्हे दाखल.
दिनांक २५.०३.२०२४ रोजी सायंकाळी १८.३० व दिनांक २६.०३.२०२५ रोजीचे पहाटे ०५.०० वाजण्याच्या सुमारास
परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारु विक्री, मटका जुगार
खेळविणारे तसेच गांजा पिनारे ईसमांची खात्रीलायक माहिती मिळालेवरुन त्यांनी तात्काळ पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे
एकुण ११ पथके तयार करुन त्यांना सदर ठिकाणी पंचासह जावुन छापा टाकुन कारवाई करणेबाबत मार्गदशर्न व सुचना देवुन
शिताफीने छापेमारी करुन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार सदर पथकाने पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमधील
मिळालेल्या माहिती नुसार ठिक ठिकाणी जावुन शिताफीने छापेमारी करुन मुंबई दारुबंदी कायद्याखाली एकुण १४, मुंबई जुगार
कायद्याखाली एकुण ०३ व NDPS कायद्यांतर्गत ०१ असे एकुण १८ गुन्हे दाखल केलेले असुन सदर छापेमारी एकुण
५६४७०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
तरी यापुढे पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमध्ये अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर छापेमारी करुन कारवाईचा बडगा
उगरण्यात येणार असुन ज्या व्यक्तींवर सदर कायद्यांतर्गत एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील त्यांच्याविरुध्द जास्तीत जास्त
रक्कमेचा बॉन्ड घेवुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसेच यापुढेही सदर इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही
फरक न पडल्यास हद्दपार सारखी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर कारवाई
चालु राहणार आहे ठणकावुन सांगितले.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला सो पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा. श्रीम. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक
श्रीरामपुर व उप विभागीय पो. अधिकारी श्री. सुनिल पाटील सो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांचे सुचना
मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ. खाडे यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी
व पोलीस अंमलदार यांनी कलेली आहे.