ज्यांना भुतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ यांची जाणीव असते ते जग जिंकल्या शिवाय राहत नाही- डॉ शीरिष लांडगे

संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) दिनांक- 01/01/2023
भेंडा येथील सुनील वाबळे ज्ञानसरिता समाजकार्य पुरस्काराने सन्मानित.
सविस्तर माहिती– नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठाणच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यां व्यक्तीनां सन २०२२ – २३ चे ज्ञानसरिता पुरस्कार जाहिर करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे व उपाध्यक्ष डॉ. संतोष तागड यांनी दिली.
या प्रतिष्ठाणच्या वतीने गेल्या दहा वर्षा पासुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ज्ञानसरिता पुरस्कार सन्मान चिन्ह , सन्मानपत्र व शाल पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात येते असे प्रतिष्ठाणचे सचिव पत्रकार सुनिल पंडित यांनी सांगितले .
या वर्षाचे पुरस्कार पुढिल प्रमाणे – ज्ञानसरिता आदर्श पत्रकारिता पुरस्कार गुरुप्रसाद देशपांडे (नेवासा ) , ज्ञानसरिता साहित्यरत्न पुरस्कार कवी डॉ. कैलास दौंड
( पाथर्डी ), ज्ञानसरिता कलाभूषण पुरस्कार शाम शिंदे
( अ.नगर ), उत्कृष्ट रंगकर्मी उदय वैद्य ( अहमदनगर ) ज्ञानसरिता आदर्श सरपंच पुरस्कार दिनकरराव गर्जे
( वडुले ), ज्ञानसरिता समाजकार्य पुरस्कार सुनिल वाबळे , ज्ञानसरिता समाजरत्न पुरस्कार दिंगबर रिंधे, ज्ञानसरिता समाजभूषण पुरस्कार डॉ. करणसिंह घुले, ज्ञानसरिता शिक्षकरत्न पुरस्कार अशोक पंडित ( जि. प.प्रा.शाळा भेंडा खुर्द ) या सर्व पुरस्कारार्थीना मुकींदपूर ( नेवासा फाटा ) येथील श्रीराम साधना आश्रम येथे आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षीय भाषणात डॉ शिरिष लांडगे यांनी बोलतांना सांगितले की. सगळी माणसं स्वत साठी जगतात पण काही माणसं हे समाजाच्या हितासाठी जगत असतात.आपला भुतकाळ, वर्तमान काळ भविष्यकाळ, यांची जाणीव ज्यांना होते ते जग जिकल्या शिवाय राहत नाही. रविवार दि. १ जानेवारी रोजी झालेल्या पुरस्कार संमारंभ मंहत सुनिलगिरी महाराज यांच्या हस्ते व साहित्यीक व विचारवंत प्रा.डॉ. शिरीष लांडगे,हस्ते संपन्न झाला.या पुरस्कार सोहळ्यासाठी लोचनाबाई इंडस्ट्रीजचे संचालक बजरंग पुरी, शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनिल गोसावी , (संतोष औताडे-पञकार) , प्रतिष्ठाणचे सचिव सुनिल पंडित, सदस्य अश्विनी थोरात, निलेश पठारे , दत्तात्रय कोकरे, रवि कांबळे, संजय शिंपी, वैभव कांबळे यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.