मैञी नंतर प्रेमाचे नाटक करुन 30 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या मुलीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश

(संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा ) दिनांक-14/01/2023
सविस्तर माहिती- सदर गुन्हयाची थोडक्यात हकिकत अशी की , यातील फिर्यादी वय 40 वर्षे वयाचे इसम असुन त्यांना नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांना एका अनोळखी मुलीचा क्रेडीट कार्डच्या संदर्भात फोन आला होता . थोड्याच दिवसात त्यांच्यात जवळची मैत्री निर्माण झाली . त्या महिलेने फिर्यादीस व्हॉटसअप व इन्स्टांग्राम कॉल , चॅटींग करून नंतर फिर्यादीस दि . 17/12/2022 रोजी सांय 06/00 वा.चे सुमारास कोल्हार खुर्द येथील एका लॉजवर आरोपी हिने फिर्यादीस भेटुन त्याला देवाच्या प्रसादात गुंगीकारक पदार्थ मिळवुन खायला दिला . त्यांनतर दारू पाजुन गुपचुप त्याचे मोबाईलच्या साह्याने तिचे व त्याचे अश्लील नग्न फोटो व व्हिडिओ काढले फिर्यादीस त्यांचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांचेकडुन एकुण ३०,००,००० / – रूपये खंडणीची मागणी केली व दि . 31/12/2022 रोजी फिर्यादीने घाबरुन दि 31/12/2022 रोजी 21000 / – रुपये आरोपीस ऑनलाईन ट्रासफर केले होते . त्यानंतर नियमित ३०,००,००० / – रुपयाची मागणी केली आहे . पैसे दिले नाही तर तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली आहे वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून दि . 02/01/2023 रोजी राहुरी पोलीस ठाणे गु.र.क्र . 12/2023 दि . 17/12/2022 भादवी कलम 328.३८४ , ३८5 , 506 अन्वये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर फिर्यादी व त्याचा चुलत भाऊ हे मा.स्वाती भोर मॅडम सो . अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर , मा.संदीप मिटके सो .. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर यांना भेटुन सदरचा प्रकार सांगितला होता . सदर गुन्ह्याचा तपासात फिर्यादीस सोबत घेवून तपास करत असतांना यातील महिला आरोपी तिचे लोकेशन सारखी बदलत होती तसेच तिचा मोबाईल बंद येत असल्याने ती सारखी पोलीसांना हुलकावनी देत होती . आरोपी महिला ही फिर्यादीस व्हॉटसअप व इन्स्टाग्रामने कॉल , चॅटींग करून फिर्यादीस पैश्याची मागणी करत असल्याने तिला पकडणे जिकिरीचे जात होते . तरी तात्रींक विश्लेशन व गोपनिय माहीतीच्या आधारे सदर महिला आरोपीस तपासी अधिकारी पोउनि चारुदत्त खोंडे व पो . कॉ . / सय्यद , म.पो.ना. / कोळेकर यांचे पथकाने उत्कृष्ठरित्या कर्तव्य बजावुन पुणे येथून अटक केली आहे . तपासादरम्यान सदर महिला आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली फिर्यादी याचा भाचा याच्याशी पुण्यात अगोदरपासुन मैत्री असल्याने त्याने व सदर महिलेने गुन्ह्याचा कट रचला होता असे कबुल झाल्याने फिर्यादीचा भाऊ याची चौकशी केली असता त्याचा सदर गुन्ह्यात स्पष्ठ सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास देखील अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे . तसेच सदर गुन्ह्यात भादवि कलम 120 व याची वाढ करण्यात आली आहे . . तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि , सोशल मिडीया वर कोणत्याही अनोळखी व्यक्ती सोबत मैत्री करू नका . सध्या सेक्सटोर्शन हा गुन्ह्याचा प्रकार खुप जास्त प्रमाणात आढळुन येत असल्याने बरेच नागरिक यास बळी पडत आहेत . असा पक्रार झाल्यास त्वरीत पोलीसांना कळवावे . आपले नाव गोपनिय ठेवण्यात येईल . सदरची उत्कृष्ठ कामगीरी मा.श्री राकेश ओला सो . पोलीस अधिक्षक अहमदनगर , मा.स्वाती ओर सो , अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर मा . संदीप मिटके सो . , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे , पो.उ.नि. / चारूदत्त खोंडे , पो.कॉ. / सय्यद , म.पो.ना. / कोळेकर केली.