भिंगार कॅम्प पोलीस व गंगामाता वाहन शोध संस्थेचा अभिनव उपक्रम 65 बेवारस वाहनांच्या मालकांचा लावला शोध.

संतोष औताडे / मुख्य संपादक दि.16/03/2022
भिंगार कॅम्प पोलीस व गंगामाता वाहन शोध संस्थेचा अभिनव उपक्रम 65 बेवारस वाहनांच्या मालकांचा लावला शोध.· सविस्तर माहिती-अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन , भिंगार परीसरात शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात . मात्र न्यायालयीन प्रक्रीयेमुळे वाहनाचे मालक मिळून येत नसल्याने सदर वाहन पोलीस ठाणे आवारात वर्षानुवर्षे मलकाच्या प्रतिक्षेत धुळखात पडून आहेत त्यामुळे पोलीस ठाण्याचा परीसर बकाल व विचित्र दिसून येतो . त्यामुळे पोलीस ठाणे सुशोभिकरणास बाधा निर्माण होत आहे . ही बाब लक्षात घेऊन कॅम्प पोलीस स्टेशन , भिंगार ने बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला . कॅम्प पोलीस स्टेशन आवारातील वर्षानुवर्षे धुळखात पडलेली बेवारस व विविध गुन्ह्यातील जप्त वाहने यांचे मुळ मालकाचा शोध घेऊन ती वाहने मुळ मालकांना परत देण्याचे आदेश पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना मा.पोलीस अधिक्षक सो , अहमदनगर यांनी दिले होते . त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कॅम्प पोलीस स्टेशन आवारातील अनेक वर्षे धुळखात पडलेल्या वाहनांचे चेसीस व इंजीन नं वरून 08 दिवसांत एकून 65 वाहनांचे मुळ मालकांचा शोध मावळ तालुक्यातील परंदवाडी जिल्हा पुणे येथील गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने पोलीसांनी शोध लावला आहे . मा . पोलीस अधिक्षक मनोज पाटील सो अहमदनगर यांच्या आदेशान्वये मा . अपर पोलीस अधिक्षक श्री सौरव कुमार अग्रवाल सो . मा . उप विभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल कातकाडे सो , यांचे मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस स्टेशन आवारात मालकाच्या प्रतिक्षेत अनेक वर्षापासून बेवारस व विविध गुन्ह्यात जप्त असलेल्या 65 वाहनाच्या मालकांचा शोध घेण्यास सहा . पोलीस निरीक्षक श्री शिशिरकुमार देशमुख सो , पो उप निरीक्षक श्री सतिष शिरसाठ सो , मुद्देमाल कारकून सफो / आर . एस . वैरागर , पोना / 2178 राहुल राजेंद्र द्वारके , पोना / 1584 संतोष आडसुळ व संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत , उपाध्यक्ष बाबासाहेब वागडे , भारत वाघ , गोरख नवसुपे , संजय काळे यांना यश आले आहे . सदर शोध लागलेल्या वाहनांच्या मालकांनी आपली | वाहनांची ओळख पटवून व पुरावे देऊन परत घेऊन जाणे बाबत आव्हान पोलीसांनी केले आहे . कॅम्प पोलीस स्टेशन , भिंगार , अहमदनगर आवारात 82 गाड्या पडून आहेत . त्यापैकी 65 वाहन मालकांचा शोध लागला असून बाकी वाहन मालकांचा शोध लावण्याचा तपास चालू आहे . तरी वाहन मालकाने वाहनांचे नोंदणी क्रमांक , वाहनाचा प्रकार , चेसीस नं , इंजीन नं , वाहन मालकाचे नाव , पत्ता यांची यादी पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेली आहे . तसेच सोबत वाहानांची यादी सादर केली आहे . सदर यादी मध्ये आपले वाहन / नाव असल्यास अशा मालकांनी ओळख पटवून आपले वाहने घेऊन जावीत . गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने शोध लागलेल्या एकून 65 वाहन मालकांशी संपर्क साधला जाणार आहे . व शोध लागलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने तात्काळ कॅम्प पोलीस स्टेशन , भिंगार , अहमदनगर येथून वाहनांची कागदपत्रे स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र दाखवून घेऊन जावीत . सदरची वाहने पत्र मिळताच 15 दिवसांचे आत घेऊन जावीत नसता ते वाहने बेवारस समजुन सरकारी प्रक्रिीया पुर्ण करून लिलाव करण्यात येणार आहेत . असे सहा . पोलीस निरीक्षक श्री. शिरीषकुमार देशमुख यांनी सांगीतले.