मंदीर चोरीतील ४ सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरकडुन जेरबंद ८ गुन्हे उघड.

संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा दिनांक –22/08/2023
मंदीर चोरीतील ४ सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखा
अहमदनगरकडुन जेरबंद ८ गुन्हे उघड.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. तुषार विजय वैद्य वय ३६, धंदा- पुजारी, रा. पाथर्डी हल्ली रा.
रेणुकामाता मंदीर अमरापुर, ता. शेवगांव हे पुजारी असलेल्या रेणुकामाता मंदीराचे अनोळखी आरोपींनी दरवाजाचे कुलूप
तोडुन देवीचे अंगावरील १६,७६,४००/- रुपये किंमतीचे विविध प्रकारचे सोन्य चांदीचे दागिने चोरुन नेले होते. सदर घटने
बाबत फिर्यादी यांनी शेवगांव गु.र.नं. ८०९/२३ भादविक ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मंदीर चोरीची घटना संवेदनशिल असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी
पोनि / श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना स्थागुशाचे विशेष पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास
करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई / तुषार धाकराव, पोहेकॉ/ दत्तात्रय
हिंगडे, विजय वेठेकर, देवेंद्र शेलार, पोना / रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, संदीप चव्हाण, पोकॉ/ आकाश काळे, अमोल
कोतकर, भाऊसाहेब काळे, चापोना / भरत बुधवंत व चापोकॉ/ अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक
नेमुन आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथक शेवगांव परिसरात पेट्रोलिंग फिरुन रेकॉर्डवरील
आरोपींची माहिती घेताना पोनि / दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत • मिळाली की, मंदीर चोरीचे गुन्हे हे इसम
नामे धनंजय काळे रा. संवत्सर, ता. कोपरगांव यांनी त्याचे इतर साथीदारासह केले असुन ते काळे रंगाचे डिलक्स मोटार
सायकलवर अहमदनगर ते सोलापुर रोडवर तुक्कडओढा येथील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ थांबलेले आहेत आता
गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि / श्री. आहिरे यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना
सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले. पथकाने नमुद ठिकाणी जावुन पहाणी करता एका मोटार
सायकलसह दोन इसम उभे असलेले दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस पथकाची
ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) धनंजय प्रकाश काळे वय २५, रा. रामवाडी,
संवत्सर, ता. कोपरगांव, २) भगवान दिलीप परदेशी वय ३८, रा. व्दारकानगर, शिर्डी, ता. राहाता असे सांगितले.
त्यांचेकडे मंदीर चोरीचे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार नामे अमोल पारे, रा. येवला रोड, ता.
कोपरगांव व राहुल लोदवाल, रा. बेलापुर, ता. श्रीरामपूर अशांनी मिळुन केला असल्याचे सांगितल्याने त्यांचा शोध घेता
आरोपी नामे ३) अमोल लक्ष्मण पारे वय ३०, रा. येवला रोड, ता. कोपरगांव व ४) राहुल केसरसिंग लोदवाल वय ३२,
रा. बेलापुर, ता. श्रीरामपूर हल्ली रा. शिर्डी, ता. राहाता हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल
विचारपुस करता त्यांनी पुढील प्रमाणे १) राहुरी गु.र.नं. ८५२ / २३ भादविक ४५७, ३८०, २) राहुरी गु.र.नं. २२० / २३
भादविक ४५७, ३८०, ३) कोपरगांव तालुका गु.र.नं. ११ / २३ भादविक ४५७, ३८०, ४) कोपरगांव तालुका गु.र.नं.
६०/२३ भादविक ४५७, ३८०, ५) कोपरगांव तालुका गु.र.नं. ७३ / २३ भादविक ४५७, ३८०, ६) श्रीरामपूर शहर गु.र.नं.
८१९/२३ भादविक ४५७, ३८०, ७) भोकरदन, जिल्हा जालना गु.र.नं. ४३८/२३ भादविक ३७९ व ८) भिंगार कॅम्प
गु.र.नं. ४६७/२३ भादविक ३९२, ३४ प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींनी अ. क्र. १ ते ६ मंदीर चोरीचे
गुन्ह्यातील ५०,०००/- रुपये रोख रक्कम काढुन दिल्याने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेवुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन
येथे हजर केले आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई मा.पोलिस अधिक्षक राकेश ओला साहेब,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संपतं भोसले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पदाधिकारी यांनी केली आहे.