श्रीरामपूर शहरातील मोकळ्या मैदानांवर राञी अचानक पोलिसांकडून तपासणी सोमनाथ वाकचौरे यांनी घेतली हुल्लडबाजी करणारांची परेड.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -02/09/2026 श्रीरामपूर शहरातील मोकळ्या मैदानांवर राञी अचानक पोलिसांकडून तपासणी सोमनाथ वाकचौरे यांनी घेतली हुल्लडबाजी करणारांची परेड.
काल रात्री आठ ते दहा वाजेच्या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , पोलीस निरीक्षक श्रीरामपूर त्याचप्रमाणे आरसीपी पथकाकडून रात्री आठ ते दहा वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर शहरातील थत्ते मैदान त्याचप्रमाणे महाले पोद्दार शाळेसमोरील क्रिकेटच्या मैदानांवर तपासणी करण्यात आली
.या ठिकाणी रिकामी बसून असणाऱ्या तरुणांवर त्याप्रमाणे मद्यपान सेवन करत असणाऱ्या सुमारे ३२ वाहनांवर / व्यक्तींवर दंडत्मक कारवाई यादरम्यान करण्यात आली . विशेष म्हणजे श्रीरामपूर शहरातील गोंधवणी त्याप्रमाणे अन्य आऊटसाईडर एरियामधील तरुण देखील या मैदानांवर मद्यपान सेवन करत असल्याचे / केवळ गप्पागोष्टी करण्यासाठी येऊन बसलेले असल्याचेयादरम्यान निदर्शनास आले आहे .या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे . त्याचप्रमाणे यापुढे देखील या पद्धतीच्या कारवाया सुरू करणार आहेत.
त्याच कारवाईदरम्यान थत्ते मैदान या ठिकाणी मिळून आलेल्या दोन फोर व्हीलर चालकांवर देखील पूर्ण ब्लॅक फिल्म असल्यामुळे त्यांच्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेले आहेत.
रात्रीच्या वेळी कुटुंबासह फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना या हुल्लडबाज तरुणांमुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून तक्रारी वाढत असल्यामुळे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पुढाकार घेऊन ही कारवाई केलेली आहे .यापुढे देखील या पद्धतीच्या कारवाया सुरू राहणार आहेत.
परिसरातील सर्वसामान्य नागरिकांकडून या कारवाई बद्दल कौतुक करण्यात येत आहे व अशीच कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे



