ब्रेकिंग

अल्पावधीत मोठया परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या ग्रो – इन्व्हेस्टर कंपनी विरुध्द केलेल्या कारवाईमुळे ठेवीदारांना ठेवी मिळणार .

संतोष औताडे – मुख्य संपादक नेवासा,               दिनांक -11/03/2026
अल्पावधीत मोठया परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या ग्रो – इन्व्हेस्टर कंपनी विरुध्द
केलेल्या कारवाईमुळे ठेवीदारांना ठेवी मिळणार . सविस्तर माहिती- 
अहिल्यागनर जिहयामध्ये सामान्य जनतेस अल्पवधीत मोठया प्रमाणात परतावा देण्याचे अमिष
दाखवुन इन्व्हेस्टर कंपन्याकडुन अनेकांची लाखोंची फसवणुक केल्याप्रकरणी विविध ठिकाणी संबधीत
पोलीस स्टेशनला यापुर्वी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
अहिल्यानगर जिल्हयामध्ये अल्पवधीत अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य
जनतेची लूट करणाऱ्या ग्रो – इन्व्हेस्टर कंपनीचा पोलीसांचे अत्यंत सतर्कतेने पर्दाफाश केला आहे व या
धाडसी कारवाईमुळे अनेक नागरिकांचे कष्टाचे पैसे त्यांना परत मिळाले असुन अनेक नागरीक सदर
फसवणुकीत पैसे बुडण्यापासून वाचले आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक,
श्रीरामपूर यांना गोपनिय माहिती मिळाली की, ग्रो – इन्व्हेस्टर कंपनी, भोकर, ता. श्रीरामपुर शिवारात
अहिल्यानगर व आजुबाजुच्या जिल्हयामध्ये मोठा परतावा देण्याचे अमिष दाखवुन सामन्य जनतेकडुन
मोठ्या रकमा स्विकारण्यात येत आहे. व त्यामध्ये अनेक नागरीक पैसे गुंतवणुण त्यांची फसवणुक होत
आहे. अशी बातमी मिळाल्याने कोणतीही तक्रार येण्याची वाट न पाहता स्वत:हून पुढाकार घेवुन
्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांनी श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस
अधिकारी, श्रीरामपुर, यांचे अधिपत्याखाली अपर पोलीस अधीक्षक, कार्यालयातील पोलीस अधिकारी
अंमलदार तसेच श्रीरामपुर तालुका पो.स्टे., व श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार
यांचे पथक तयार करुन सदर ठिकाणी शहानिशा करुन कारवाई करण्याचे आदेशीत केले.
पथकाने दिनांक २६/१२/ २०२५ रोजी नमुद ठिकाणी पंचासह छापा टाकला असता संदिपराज
मोहिणीबाई कपाटे, वय ३६ वर्ष, रा. हनुमानवाडी, भोकर शिवार, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर हा मिळुन
आला त्यास पथकाने त्यांची ओळख सांगुन त्याचे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल करुन
त्याचेकडे कोणताही लोकांकडुन पैसे स्विकारण्याबाबतचा परवाना नसलेबाबत सांगीतले. त्यानंतर पथकाने
त्यास झडतीचा उददेश सांगुन त्याचे राहते घराची घरझडती घेतली असता त्याचे घरामध्ये ९ पासबुक, १०
चेकबुक, १ हिशोब नोंदवीलेली वही, १ अॅपल कंपीनचा लॉपटॉप, ३ कॉम्युटर स्क्रिन, २ पेड ड्राईव्ह, १ कॅश
काऊंन्टींग मशीन, २ तिजोरी, ३ वॉकीटॉकी, १ H. H.M.D., व १,०४,६००/- रुपये रोख रक्कम असे मिळुन
आले आल्याने ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे.
सदर प्रकरणात पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्वतः फिर्यादी होऊन श्रीरामपुर
तालुका पो.स्टे. गु.र.नं. ०५/२०२६ भा. न्या. सं. कलम ३१८ ( ४ ), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर
गुन्हा दाखल होताच आरोपीने कायदेशीर कारवाईच्या भितीपोटी स्वतः त्या – त्या ठेवीदारांना ठेवी परत
केल्या आहेत. तसे ठेवीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहे. अन्य ठेवीदारांचे देखील जबाब नोदंवीण्याचे
काम सुरु असुन त्यांना देखील ठेवी परत केल्या जात आहेत. सदर तपासामध्ये आरोपींकडुन अदयाप
पावेतो एक कोटीरुपये पेक्षा अधिक रकमेच्या ठेवी परत केल्या आहेत. तसेच सध्या गुन्हयाचा तपास सुरु
असुन या व्यतिरीक्त देखील काही ठेवीदारांच्या रकमा परत मिळाल्या नसल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक,
श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा.सदर ठिकाणी कोणतीही परवानगी नसताना सुरू असलेला हा आर्थिक गैरव्यवहार श्रीरामपुर
पोलीसांचे सतर्कतेमुळे रोखण्यात आला आहे. त्यामुळे हा घोटाळा अधिक मोठा होण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण
मिळवता आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात यापूर्वी अशा अनेक कंपन्यांनी जनतेची फसवणूक केली आहे.
मात्र पोलीसांनी वेळीच केलेल्या या कारवाईमुळे ग्रो- इन्व्हेस्टर कंपनीच्या जाळ्यात अडकणाऱ्या नवीन
गुंतवणूकदारांचे संरक्षण झाले आहे.
तरी सामान्य जनतेस आव्हान करण्यात येते की, नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना
बळी पडू नये आणि अशा प्रकारच्या गुंतवणुकीपूर्वी अधिकृत परवान्याची खात्री करावी. अशा प्रकारे
अल्पवधीत मोठया प्रमाणात परतावा देण्याचे अमिष दाखवुन कोणाची फसवणुक झाली असेल किंवा
तसा प्रयत्न होत असेल तर त्यांनी पोलीसांशी संपर्क साधावा.
सदरची कारवाई ही मा. श्री. सोमनाथ घार्गे सारे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,
श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. जयदत्त भवर,
उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर, पोसई सतिष डौले, पोसई दादाभाई मगरे, पोहेकॉ दादासाहेब
लोंढे, पोना संदिप दरंदले, पोकॉ सहदेव चव्हाण, पोकॉ अशोक गाढे, पोना दादासाहेब गुंड, पोना अनिल
शेंगाळे, मपोका पुजा भावसार, मपोकॉ अरुण पवार, मपोकॉ मिरा सरग यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे