(संतोष औताडे- मुख्य संपादक,नेवासा ). दिनांक -03/04/2026
त्रीमुर्तीचे सचिव मनिष घाडगे आत्महत्या प्रकरणी अध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल.

सविस्तर माहिती- नेवासा फाटा येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे पाटील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती .संस्थेचा राजीनामा देण्यासाठी आणि मालमत्ता नावावर करण्यासाठी खोट्या गुन्ह्यांची धमकी देऊन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मनिष घाडगे यांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेच्या अध्यक्षांसह सहा जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५ पासून मनीष घाडगे पाटील यांच्यावर संस्थेचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यांच्या नावावर असलेली वैयक्तिक मिळकत संस्थेच्या नावे करावी, यासाठी आरोपींनी त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला. जर राजीनामा दिला नाही, तर खोट्या बदनामीच्या केसेस दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आली होती. या जाचाला कंटाळून २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्यांच्या पत्नीने पोलिस स्टेशन येथे
मनीषा घाडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी खालील सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहे.
१. सुमती साहेबराव घाडगे पाटील (अध्यक्षा, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान)
२. स्नेहल साहेबराव घाडगे (मुलगी)
३. श्रुती साहेबराव घाडगे (मुलगी)
४. चेतन चव्हाण (मोठा जावई)
५. सोपान बाजीराव काळे (प्राचार्य, रा. तेलकुडगाव)
६. अनुराधा उत्तम गोरे (समन्वयक, रा. जळके) यांच्यावर गुन्हा अधिनियम कलम 339/2026 भारतीय न्यायसहिंता 108,115 (2) 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
“माझ्या पतीला पदाचा राजीनामा देण्यासाठी आणि त्यांची मालमत्ता बळकावण्यासाठी आरोपींनी खोट्या गुन्ह्यांच्या धमक्या दिल्या. सततच्या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे.”असे फिर्यादीत म्हटले आहे.
या संपुर्ण घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल हे जिल्ह्यातील एक मोठे नाव आहे. मात्र, संस्थेच्या अंतर्गत वादातून आणि मालमत्तेच्या हव्यासापोटी एका उच्चशिक्षित सचिवावर आत्महत्येची वेळ आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. संस्थेच्या अध्यक्षा, त्यांच्या मुली आणि जावयावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे.
नेवासा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सागर ढिकले साहेब हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.



