अहिल्यानगर ग्रामीण पोलीस दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन चा समावेश पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते उद्घाटन.

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा, दिनांक- 27/08/2025
अहिल्यानगर ग्रामीण पोलीस दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन चा सोमनाथ घार्गे साहेब यांच्या उपस्थितीत समावेश करण्यात आला .सविस्तर माहिती- उपविभागीय पोलीस अधिकारी, अहिल्यानगर ग्रामीण करीता
नविन मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनचा गणेश चतुर्थीचे दिवशी श्रीगणेशा
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते राज्यातील मोबाईल फॉरेन्सिक
व्हॅन्स प्रकल्पाचे लोकार्पणान्वये, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ अंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकुण २५९
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स कार्यान्वित करण्यात आल्या असून, त्यापैकी आज दिनांक २७/०८/२०२५ रोजी
नमुद प्रकल्पातील अहिल्यानगर जिल्हया करीता पहिली व्हॅन अहिल्यानगर जिल्हयातील उपविभागीय पोलीस
अधिकारी,

नमुद व्हॅनसोबत ०८ जणाची टिम, त्यांचे मध्ये समाविष्ठ सहायक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक
सहायक, चालक आणि सहायक असणार असून, २४ तास सेवेत कार्यरत राहणार आहे. सात किंवा त्यापेक्षा
जास्त वर्षापेक्षा शिक्षा असलेले गुन्हया करीता पुरावे गोळा करण्याकरीता नमुद व्हॅन उपयोगात येणार आहे.
फॉरेन्सिक व्हॅन मध्ये तांत्रिक, रासायनिक, जैविक आणि भौतिक पुरावे गोळा करण्यासाठी लागणारी उपकरणे
जसेकी ब्लड डिटेक्शन किट, सिमेन डिटेक्शन किट, नारकोटीक्स डिटेक्शन किट, गणशॉट डिटेक्शन किट,
रेसिडीव्ह डिटेक्शन किट अशा अनेक प्रकारच्या किट असल्याने, गुन्हयात फॉरेन्सिक पुरावे गोळा
करण्याकरीता मोटा उपयोग होणार आहे. पुरावे गोळा करुन सील केल्यानंतर त्याला कोणत्याच प्रकारे
छेडछाड करता येणार नाही, याकरीता सिक्युरिटी ब्लॉक दिले आहेत. तसेच घटनास्थळा चे सर्व व्हिडीओ
रेकॉर्डींग व फोटो करीता एक टॅब सुध्दा उपलब्ध असणार आहे.
फॉरेन्सिक व्हॅनमुळे न्यायालयात गुन्हेगारान विरोधात भक्कम पुरावा राहणार असुन, बऱ्याचदा साक्षीदार
ऐनवेळेवर फितूर होतो व त्याचा फायदा गुन्हेगांरांना मिळतो, विशेषतः सराईत गुन्हेगार ज्या पध्दतीने
सुटण्याचा प्रयत्न करतात अशा पध्दतीला मोठा चाप बसणार आहे. भारतीय साक्ष अधिनियम- २०२३ मधील
पुराव्याकरीता फॉरेन्सिक पुराव्यांची मोठी मदती मिळणार आहे.
सदरची व्हॅन ही उपविभागीय पोलीस अधिकारी,

राहणार असून, नियंत्रण कक्षातील संदेशावरुन ही व्हॅन घटनास्थळावर पोहचून तेथील तांत्रिक, रासायनिक
जैविक आणि भौतिक पुरावे गोळा करून, गुन्हेगांरांना पूराव्या अभावी सुटका होणे यावर निश्चितपणे चाप
बसणार आहे.