मा.मनोज जरांगेपाटिल यांच्या अंतरवाली -मुंबई मोर्चा प्रसंगी अहिल्यानगर जिल्हा हद्दीतील वाहतूक मार्गात बदल.

संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा, दिनांक- 25/08/2025
सविस्तर माहिती- मा. मनोज जरांगेपाटिल यांच्या अंतरवाली -मुंबई मोर्चा प्रसंगी अहिल्यानगर जिल्हा हद्दीतील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे आगामी काळात मराठा आरक्षण प्रसंगी अहिल्यानगर जिल्हा हद्दीतील श्री. मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली – मुंबई मोर्चा मार्गावरुन जाणारी
अवजड व माल वाहतुक वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. असे आदेश सोमनाथ घार्गे साहेब यांनी काढले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी श्री. मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी ता. अंबड जि.जालना येथुन
आझाद मैदान, मुंबई येथे जाणार आहेत. सदरचा मोर्चा हा दिनांक २७/०८/२०२५ रोजी अहिल्यानगर जिल्हा हद्दीतील घोटण,-
शेवगाव,- मिरी-, माका,- पांढरीपुल, -अहिल्यानगर बायपास- मार्गे, नेप्ती चौक, आळेफाटा मार्गे शिवनेरी- किल्ला-, जुन्नर येथे मुक्कामी
जाणार आहेत. श्री.मनोज जरांगे पाटील यांचे मोर्चाचे दरम्यान सदर मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होवुन मोठया प्रमाणात वाहतुक
कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असुन सदर मार्गावरील वाहनाचा
मोर्चा मधील नागरीकांना धक्का लागुन, अपघात होवुन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे दि. २७/०८/२०२५ रोजी मोर्चा आगमन व निर्गमन होईपर्यंत अहिल्यानगर जिल्हा हद्दीतील घोटण,- शेवगाव- मिरी- माका-
पांढरीपूल- अहिल्यानगर बायपास मार्गे, नेप्ती चौक या मार्गावरील सर्व प्रकारची अवजड व माल वाहतुक खालील पर्यायी मार्गाने
वळविणे नियोजित केले आहे.
१) छत्रपती संभाजीनगर कडून नेवासा फाटा- पांढरीपुल – अहिल्यानगर शेडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जानाऱ्या सर्व
प्रकारच्या अवजड व माल वाहतुक करणाऱ्या वाहनांकरीता वाहतुकीचा पर्यायी मार्गाने नेवासा फाटा- श्रीरामपूर- राहुरी फॅक्टरी- विळद बायपास- मार्गे इच्छित स्थळी जातील.
२) अहिल्यानगर कडून अहिल्यानगर- एमअयडीसी-
शेडी बायपास- पांढरीपुल मार्गे इच्छित स्थळी जानाऱ्या सर्व
प्रकारच्या अवजड व माल वाहतुक करणाऱ्या वाहनां करीता वाहतुकीचा पर्यायी मार्ग
३) शेवगाव कडून मिरी-
विळद बायपास- राहुरी फॅक्टरी- श्रीरामपूर- नेवासा फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
माका मार्गे पांढरीपुला कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
कुकाणा नेवासा फाटा मार्गे इच्छित स्थळी किंवा शेवगाव जातील.
४) पांढरीपुल कडून मिरी माका मार्गे शेवगाव कडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग जेऊर- कोल्हार -घाट चीचोंडी मार्गे इच्छित स्थळी जातील
तिसगाव मार्गे इच्छित स्थळी
प्रस्तुत आदेश शासकीय वाहने, श्री मनोज जरांगे पाटील यांचे मोर्चामध्ये असणारी वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक
कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही असे या आदेशात म्हटले आहे.