
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा. दिनांक 16/08/2025.
सविस्तर माहिती- अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बायको नांदायला येत नाही म्हणुन चार आपत्यां सह पतीने आपले जीवन संपविले आहे.
कोऱ्हाळे परिसरात ह्रदय पिळवून टाकनारी घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्वत: हात पाय बांधुन आत्महत्या केल्याची शक्यता आहे तसेच शिवानी अरुण काळे ( वय 8 ) , प्रेम अरुण काळे ( वय 7 ) वीर अरुण काळे ( वय 6) , कबीर अरुण काळे ( वय 5 ) अशी मयतांची नावे आहेत.वडील अरुण काळे यांचेसह एक मुलगा, एक मुलगी तीन बॉडी बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी काळे यांची मोटारसायकल शिर्डी–नगर बायपासलगत को-हाळे शिवारात उभी आढळली. ते आपल्या मुलांसह मोटारसायकलवरून येथे आले आणि नंतर विहिरीत उडी मारली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
