संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा दिनांक- 23/10/2024
नेवासा तालुक्यातील खडका फाटा टोलनाक्यावर खाजगी बस जळुन खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सविस्तर माहिती- अहिल्या नगर – संभाजी नगर महामार्गावरील नेवासा फाटा येथील खडका फाटा टोलनाक्यावर आज सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एका खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस ला भीषण आग लागली होती. गाडीचे टायर फुटल्याने ही आग लागली असल्याचे सांगितले जाते.खाजगी प्रवाशी बस लेलँड कंपनीची क्रमांक HM-19-Y-3123 साईराम ट्रॅव्हल्स कंपनीची होती.
बसमध्ये 15 प्रवासी पुणे ते जामोद असा प्रवास करीत होते. या बस मधील सर्व प्रवासी सुखरूप असुन कोणत्याही प्रकारची जिवीत झाली नसल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव साहेब आपल्या टीम सह घटनास्थळी दाखल झाले असून. परिसरातील अग्निशमन दलाच्या साह्याने आग विझली असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
य वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती काही किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पोलिसांनी सर्व वहातुक सुरळीत केली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.