ब्रेकिंग
Trending

नेवासा फाटा येथे पोलिस मदत केंद्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दताञय कराळे यांच्या हस्ते उद्घाटन.

संतोष औताडे-मुख्य संपादक ,नेवासा.                         दिनांक -11/04/2025 


सविस्तर माहिती- आज दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वा नेवासा फाटा येथे मा.दत्ताञय कराळे साहेब विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेञ तसेच पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब अहिल्यानगर यांच्या हस्ते पोलिस मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

अहिल्यानगर जिल्हा पोलिस स्टेशन अंतर्गत या पोलिस मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. नेवासा फाटा येथील पोलिस मदत केंद्र हे नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास चालू राहणार आहे तसेच या ठिकाणी दोन अंमलदार व कर्मचारी 24 तास उपस्थित राहणार.       असल्याचे नेवासा पोलीस स्टेशन चे परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक संतोष खाडे साहेब यांनी सांगितले आहे . या पोलिस मदत केंद्रामुळे स्थानिक नागरिकांना तक्रार नोंदवणे, मागदर्शन करणे किंवा तातडीची मदत करणे तसेच परिसरातील कायम व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयोग होणार आहे. या उपक्रमाचे स्थानिक व्यापारी व नागरिकांनी स्वागत केले आहे. यामुळे परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी या पोलिस मदत केंद्रांची मदत होईल असे नेवासा पोलीसांनी सांगितले.  या   नेवासा फाटा येथील पोलिस मदत केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, नेवासा पोलीस स्टेशन चे परिविक्षाधीन पोलिस उपाधिक्षक संतोष खाडे साहेब, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव साहेब, उपनिरीक्षक विजय भोंबे साहेब, उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे साहेब,सरपंच दादा निंपुगे, संदिप ढाकणे साहेब पोलिस उपनिरीक्षक,  संतोष औताडे -पञकार ) नेवासा पोलीस स्टेशन चे पोलिस कर्मचारी, तसेच परिसरातील नागरिक व पञकार उपस्थित होते. या पोलिस मदत केंद्राचे उद्घाटन झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे