गुन्हेगारी
Trending

शेअर ट्रेडींग मध्ये जास्त नफा करून देण्याचे अमिष दाखवून ५०,६३,००० फसवणूक करणारा आरोपी गुजरात राज्यातून सायबर पो.स्टे . कडून जेरबंद

(संतोष औताडे – मुख्य संपादक नेवासा, दिनांक-21/01/2023


दिनांक ०६/१०/२०२२ रोजी फिर्यादी यांनी फिर्याद दिली की , फिर्यादी यांना अदित्य पटेल फोन नं . ७२०३८७४६०७ , दिनकरभाई मेहता फोन नं . ८ ९ ४०३४१५७२ , गौतम सहा फोन नं . ८४६ ९९ ८ ९ ३५६ व रितेश भाई फोन नं . ८३४७३३४५७२ यांनी शेअर ट्रेंडीग मध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवुन देतो असे सांगुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून ५०,६३,००० / – ( पन्नास लाख त्रेसष्ठ हाजार रुपये ) रुपयांची फसवणूक केली आहे . म्हणुन माझी ७२०३८७४६०७ ८ ९ ४०३४ ९ ५७२ , ८४६ ९९ ८ ९ ३५६ , ८३४७३३४५७२ मोबाईल नंबर धारका विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे . वगैरे मचकुरचे फिर्यादी वरुन गुन्हा सायबर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६८/२०२२ भादवि ४ ९९ , ४२० सह माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ ( D ) रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे . वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाले नंतर मा . श्री . राकेश ओला साो , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . श्री . प्रशांत खैरे साो . अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री . ज्ञानेश्वर भोसले यांचे नेतृत्वाखाली पोसई प्रतिक कोळी , पोहेकॉ योगेश गोसावी , पोहेकॉ उमेश खेडकर , राहुल हुसळे पोना दिंगबर कारखेले , मलिक्कार्जुन बनकर , निलेश कारखेले , पोकॉ अरूण सांगळे या सायबर पोलीस स्टेशन यांचे पथकाने सदर गुन्हयामध्ये तांत्रीक विश्लेषण करून वरील गुन्हयातील आरोपी हे जिल्हा मेहसाना , गुजरात येथील असल्याने वरील नमुद पथकाने सदर ठिकाणी जावून आरोपीचा सलग तीन दिवस शोध घेतला आरोपी हे तंत्रज्ञानात कुशल असल्याने ते स्वतःची ओळख लपवत होते वेळावेळी ठिकाण बदलत होते . असे असून सुध्दा वरील पथकातील तांत्रीक तपासाचे अधारे गुन्हयातील महत्वाचा आरोपी रौनककुमार रमेशभाई परमार वय २८ धंदा नोकरी रा . मु.पो.कुवासना ता . विसनगर जि . मेहसाना राज्य गुजरात ह . रा . रूम नं ६६ लवकुश प्लस सोसायटी , सुजातपुरा रोड कडी ता . कडी जि . मेहसाणा राज्य गुजरात यास ताब्यात घेतले त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे . सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्री . ज्ञानेश्वर भोसले , सायबर पो.स्टे . हे करीत आहे . – सर्व नागरीकांना सायवर पो.स्टे . च्या वतीने आवाहन करण्यात येते की , शेअर ट्रेडीग मध्ये मोठा नफा मिळून देण्याचा बहाणा करून मोठया प्रमाणात अर्थीक फसवणूक करणारे गुन्हेगार हे मेहसाणा , सुरत गुजरात , इंदोर मध्य प्रदेश येथे सक्रिय असून त्यांनी आता पर्यंत अनेक नागरीकांची फसवणूक केली आहे . तरी नागरीकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये . अनोळखी व्यक्ती वरोवर कोणाताही प्रकारे अर्थीक व्यवहार करू नये . सदर कामगिरी मा . श्री . राकेश ओला सो , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . श्री . प्रशांत खैरे साो . अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशन अ . नगर यांचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे