बस स्टॉपवर सोडतो असे म्हणत दोन महिलांना मारहाण करुन लुटणारा आरोपी ५४,५०० / – रु.किं चे मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संतोष औताडे (मुख्य संपादक). दिनांक : –२१ /०६ /२०२२
बस स्टॉपवर सोडतो असे म्हणत दोन महिलांना मारहाण करुन लुटणारा आरोपी ५४,५०० / – रु.किं चे मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
सविस्तर माहिती-फिर्यादी श्रीमती . पल्लवी प्रथमेश चिंचले , वय ३० , रा . सूर्यापार्क आरटीओ ऑफिस , जिल्हा नाशिक या व त्यांची आई असे चांदणी चौक , अहमदनगर येथे सोलापुरला जाण्यासाठी उभ्या असतांना त्यांनी एका मोटार सायकल स्वारास सोलापुरला जाण्यासाठी बस कोठे थांबते असे विचारले असता . सदर मोटार सायकल स्वाराने सोलापुरला जाणारी बस पुढच्या चौकात थांबते , मी तिकडे जात आहे तुम्ही माझ्या सोबत चला मी तुम्हाला मोटार सायकलवर नेवुन सोडतो असे म्हणुन फिर्यादी व त्यांचे आईस मोटार सायकलवर बसवुन निर्जन ठिकाणी नेवुन त्यांचे इतर तीन साथीदारांचे मदतीने बांबुने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादी व त्यांची आई यांनी परिधान केलेले
·
सोन्याचे दागिने , रोख रक्कम , दोन मोबाईल फोन व कागदपत्रे असा एकुण १,४१,५०० / – रु.किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला आहे . सदर घटने बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. २४७/२०२२ भादविक ३ ९ ४ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर घटना घडल्यानंतर मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक अहमनगर यांनी दिले होते. पोनि / श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्याने सपोनि / दिनकर मुंडे पोहेकॉ / चव्हाण , दत्ता हिंगडे , संदीप पवार , विजय वेठेकर , विश्वास बेरड , पोना / ज्ञानेश्वर शिंदे , शंकर चौधरी , संतोष लोढे , संदीप चव्हाण , दिपक शिंदे , संदीप दरदंले , पोकॉ / आकाश काळे , मेघराज कोल्हे , विनोद मासाळकर व चापोहेकॉ / संभाजी कोतकर असे आरोपींचा शोध घेत असतांना पोनि / अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , यातील एक संशयीत इसम हा संगमनेर सिन्नर रोडवरील , साईखिंडी फाटा , ता . संगमनेर येथे येणार आहे . आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि / कटके यांनी पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावून खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना देवून पथकास रवाना केले . स्थागुशा पथकाती पोलीस अधिकारी व अंमलदार हे संगमनेर सिन्नर रोडवरील , साईखिंडी फाटा येथे सापळा लावुन थांबलेले असतांना काळे रंगाचे स्प्लेंडर मोटार सायकलवर एक इसम संशयीत रित्या आजु बाजूला पाहत येतांना दिसला त्यास थांबवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिलीप ऊर्फ राहुल अशोक चव्हाण , वय २७ , रा . जळकु , ता . मालेगांव , जिल्हा नाशिक असे सांगितले . त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत चौकशी करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवून कसुन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे तीने साथीदारांसह केल्याची कबुली दिली आहे त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये रोख रक्कम , गुन्हा करणेसाठी वापरलेली मोटार सायकल व मोबाईल फोन असा एकुण ५४,५०० / – रु . कि . चा मुद्देमाल मिळुन आल्याने ताब्यात घेतले.सदरची कारवाई मा .मनोज पाटील साहेब पोलिस अधीक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल,अपर पोलीस अधीक्षक अनिल कातकडे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.