संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा, दिनांक -08/07/2024
*अचानक धाड टाकून अल्पवयीन बालकामगार मुलीची सुटका*
प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की, पारनेर पोलीस स्टेशन हद्दीतील काकणेवाडी ता. पारनेर जि.
अहमदनगर येथे एक अल्पवयीन मुलगी भाऊसाहेब वाळुंज यांचे घरी काम करीत असलेबाबत गोपनीय
माहिती मिळाली असता सदर माहितीचे अनुषंगाने तुषार गोपाळ बोरसे सरकारी कामगार अधिकारी, श्री.
ल. प्र. दाभाडे सुविधाकार, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अहमदनगर, पोहेकॉ २०२४ / समीर
, मपोहेकॉ १२४६/ अर्चना काळे, मपोहेकॉ १०८२ / अनिता पवार, नेम. ए. एच.टी.यू. अहमदनगर
पो.ना. २२४६ कल्याण लगड नेम. पारनेर पो.स्टे., तलाठी ए. एम. शेलार असे दोन पंचांसह बातमीतील
नमूद ठिकाणी काकणेवाडी ता. पारनेर जि. अहमदनगर येथे जावून दि. ०४/०७/२०२४ रोजी सकाळी
०९.०० वा. अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी एक मुलगी वय १३ ते १४ वर्षे अशी
साफसफाईचे काम करताना मिळून आली. सदर मुलगी हिस भाऊसाहेब नामदेव वाळुंज रा. काकणेवाडी
ता. पारनेर या व्यक्तीने सुमारे २ ते ३ वर्षापासून त्याचे स्वतःचे फायद्या करिता त्याचे आस्थापनेत
बालकामगार नियुक्त करून त्याचे आर्थिक व मानसिक व शारिरीक शोषण केले आहे.
सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्री प्रशांत खैरे, अपर
पोलीस अधिक्षक अहमदनगर, पो. नि. नंदकुमार दुधाळ नेम. ए. एच.टी.यू. अहमदनगर यांचे सूचना व
मार्गदर्शनाखाली पो हेकॉ / २०२४ समीर सय्यद, म पो हेकॉ १२४६ / अर्चना काळे, म पो हेकॉ १०८२ /
अनिता पवार सर्व नेम अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU) अहमदनगर यांनी केली आहे.