संतोष औताडे ( मुख्य संपादक ) दिनांक-18/05/2022
जिल्हा न्यायालयाच्या आवारातच तरूणाने अंगावर पेट्रोल ओतून घेतले पेटवून.
सविस्तर माहिती- राहुरी तालुक्यातील एका तरूणाने जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतः ला पेटून घेतल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली यामुळे न्यायालय परिसरात एकच धावपळ उडाली होती.
ऋषिकेश विठ्ठल ढवाण (रा. बाभुळगाव ता. राहुरी) असे त्या तरूणाचे नाव असून त्याने स्वतःला का पेटून घेतले याची माहिती समोर आली नसून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरूणा विरूद्ध भिंगार पोलिस स्टेशनमध्ये 204/2022भादविक 309 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या बाबत पो कॉ सचिन काशिनाथ डमाळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
आज सकाळी जिल्हा न्यायलयाचे दैनिक कामकाज सुरू झाले होते. सकाळी ११ वाजता ऋषिकेश हा जिल्हा न्यायालयात आला होता. त्याने काही शणातच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटून घेतले. यामुळे न्यायालय आवारात एकच धावपळ उडाली. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे त्याचे म्हणणे असल्याची प्राथमिक माहिती आहे.ब-याच दिवसांपासून त्याचे घरगुती वाद चालू होते असेही सांगितले जाते. न्यायालय परिसरातील पोलिस व नागरिकांच्या मदतीने फार मोठ अनर्थ टळला आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व नेमकं कोणत्या कारणाने पेटुन घेतले होते याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.