सुंगधीत तंबाखु व गुटख्याची अवैध वाहतुक करणारे 5 आरोपी 24,29,994/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

संतोष औताडे- मुख्य संपादक, दिनांक :-02/10/2023
————————————————–
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/विजय ठोंबरे, संतोष खैरे, पोकॉ/रणजीत जाधव, रोहित मिसाळ व शिवाजी ढाकणे अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमून महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाला व सुगंधीत सुपारी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. नमुद आदेशान्वये पथक माहिती घेताना दि.01/10/23 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे प्रकाश पाटील रा. कोल्हापुर हा त्याचा हस्तक नामे अविनाश कमलाकर रा. कोल्हापुर याचे मार्फत कोल्हापुर येथुन पांढरे रंगाची महिंद्रा कंपनीची पिकअप क्रमांक एमएच/10/सीआर/9762 या वाहनातुन महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस बंदी असलेला गुटखा पानमसाला व तंबाखु अवैधरित्या कब्जात बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने बोटा मार्गे ब्राम्हणवाडा अशी वाहतुक करीत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने, पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळेत ब्राम्हणवाडा गावाकडुन पांढरे रंगाची पिकअप गाडी रोडवर येवुन थांबली. त्याच वेळी ब्राम्हणवाडा गावाकडुन एक सुझूकी कंपनीची इको गाडी येवुन पिकअप जवळ थांबली व दोन्ही वाहनातील इसमांनी पिकअप गाडीतुन गोण्या काढुन इको गाडीत ठेवताना दिसले. पथकाची खात्री होताच अचानक त्यांचेवर छापा घालुन काही इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) अविनाश आण्णा कमलाकर वय 32, 2) प्रमोद सदाशिव भोरे वय 38, दोन्ही रा. हातकंणगले, जिल्हा कोल्हापुर, 3) संदीप गोरक्षनाथ शिंगवान वय 31, 4) सागर रमेश नाईकवाडे वय 19, 5) संदीप शिवाजी वाळुंज वय 27 तिन्ही रा. धामणगांव, ता. अकोले असे असल्याचे सांगितले. पथकाने पांढरे रंगाचे पिकअप वाहनाची पहाणी करता कुलर उभे करुन त्याचे पाठीमागे व इको गाडीत गोण्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली सुंगधीत सुपारी व गुटखा पानमसाला मिळुन आला त्याबाबत आरोपींकडे विचारपुस करता त्यांनी सदर माल हा 6) प्रकाश पाटील रा. इचलकरंजी, जिल्हा कोल्हापुर (फरार) व 7) शुभम चेंडके रा. शिराळ, जिल्हा कोल्हापुर (फरार) यांनी विक्री करीता पाठविला असल्याचे सांगितले व ईको गाडीतील सुंगधीत तंबाखु व पानमसाल्या बाबत विचारपुस करता आरोपींनी 8) सनि ऊर्फ सुनिल रमेश नाईकवाडे रा. धामणगांव, ता. अकोले (फरार) याचे सांगणे वरुन माल घेण्यासाठी आल्याचे सांगितल्याने आरोपींचे कब्जातुन महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाला व सुंगधीत तंबाखु, 1 महिंद्रा पिकअप, 1 सुझूकी कंपनीची ईको कार, 6 सिंफनी कुलर, विविध कंपनीचे 5 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 24,29,994/- किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन घारगांव पो.स्टे.गु.र.नं. 482/23 भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घारगांव पो.स्टे. करीत आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. श्री. सोमनाथ वाघचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.