ब्रेकिंग
Trending

हिट अँन्ड रन कायद्यात ड्रायव्हर ला 10 वर्ष शिक्षा व 7 लाखांपर्यंत दंड. ड्रायव्हर संघटना आक्रमक अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलन.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा         दिनांक-02/01/2024


हिट अँन्ड रन कायद्यात 10 वर्ष शिक्षा व 7 लाखांपर्यंत दंड. ड्रायव्हर संघटना आक्रमक अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलन* सविस्तर माहिती -केंद्र सरकारने भारतीय कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार, एखादा वाहनचालक अपघातानंतर घटनास्थळावरुन पळून गेला असला तरी कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकणार नाही. नव्या तरतुदींनुसार, अपघात झाल्यानंतर वाहन चालकाने पोलिसांना माहिती देणं बंधनकारक आहे. अन्यथा पकडल्यानंतर किमान 10 वर्षांचा कारावास होऊ शकतो. पाच ते सात हजार रूपयावर काम करणार ड्रायव्हर कसे भरणार 7 लाख रुपये दंड हा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.तुटपुंज्या पगारावर काम करनारे ड्रायव्हर आपले संसार चालवतील का शासनाचा दंड भरतील या निर्णयाविरोधात सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे.

रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीला चिरडल्यानंतर आरोपी वाहन चालकाची जामिनावर सुटका होते अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. तर दुसरीकडे अपघातात जखमी किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक पोलीस स्टेशन आणि रुग्णालयाच्या चकरा मारत फिरत असतात. अनेक प्रकरणात तर आरोपी दोषी सिद्ध झाल्यानंतरही फक्त दंडात्मक कारवाई करुन सुटका होते.अपघातातील दोषींना शिक्षा देण्यासाठी विविध कलमे अस्तित्वात आहे. शिवाय मोटार वाहन कायदा अस्तित्वात आहे. असे असताना देखील सुधारित ·मात्र, अशावेळी मोठ्या वाहनचालकांना दोषी ठरविले जाते.

सुधारित हिट ॲण्ड रन कायद्यात नव्याने कलम ३०२ म्हणजे हत्येचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. नव्या कायद्यानुसार १० वर्ष कारावासाची शिक्षा, २ लाख ते १० लाख रुपये पर्यंत दंड अशी तरतूद करून हा कायदा २० डिसेंबर २०२३ रोजी संसदेत पारीत करण्यात आला आहे.

अनेक अपघात अचानक झालेले असतात. अशावेळी मोठ्या वाहनाचे वाहनचालक नाहक भरडले जातात. त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलन साठी सर्व ड्रायव्हर संघटना आक्रमक झाल्या आहेत. यामुळे लांबलचक वाहानांच्या रांगा लागल्या असुन करोडो रुपयांचे नुकसान होत आहे.शासनाने लवकरात लवकर या कायद्यात बदल करावा असे ड्रायव्हर संघटना यांचे म्हणणे आहे. या कायद्याच्या विरोधात टॅंकर चालकांनी देखील संप पुकारला असल्याने पेट्रोल डिझेल चा तुटवडा निर्माण झाला आहे.अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी रांगा लागल्या असुन काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद पडले आहेत. यांची झळ सर्वसामान्य जनतेला बसत असुन लवकरात लवकर शासनाने तोडगा काढला पाहिजे अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ड्रायव्हर संघटना यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे