संतोष औताडे-मुख्य संपादक नेवासा, दिनांक -19/08/2023
सविस्तर माहिती -नेवासा पो.स्टे गहाळ रजि. नं. 239/2023 मधे सौ. मिरा नारायण खराडे रा. जेऊर हैबतीता. नेवासा यांनी खबर दिली की, ता. 13/8/2023 रोजी मी जेऊर हैबती येथुन नेवासा गावातील
ज्ञानेश्वर मंदीरात दर्शनासाठी आले होते परत घरी सायंकाळी 4.00 वा.चे सुमारास गेले त्यावेळी
मला माझी पर्स माझे जवळचे पिशवीत दिसली नाही खात्री करता माझी पर्स व त्यातील खालील
प्रमाणे वस्तु गहाळ झाल्या आहेत.
1) 00-00 एक लाल रंगाची रेगझीनची पर्स 2) 200-00 रु. रोख रक्कम 200 रुपयेची एक नोट
3) 12,500-00 रु. कि. चा एक विवो त्कंपनीचा वाय 16 मॉडेलचा मोबाईल फोन त्यात जिओ
कंपनीचे सिमकार्ड न 8379028595अशा वस्तु, रोख रक्कम व मोबाईल फोन गहाळ
झाले बाबत खबर दिलेने मा.पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी डोईफोडे यांचे मार्गदर्शनाखाली
ङिबी. पथकाचे पो.स.ई.श्री. ढाकणे, पा.स.ई. शैलेंद्र ससाणे, पोकॉ. शाम गुंजाळ व पोकॉ. सुमीत करंजकर
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपुर येथील आकाश भैराट अशांनी तपास केला असता
सदर गहाळ झालेली पर्स त्यातील मोबाईल फोन व रोख रक्कमेसह मिळुन आलेने ती आज
ता. 19/8/2023 रोजी मा.पो.नि. श्री. शिवाजी डोईफोडे यांचे हस्ते खबर देणार सौ. मिरा नारायण खराडे
रा. जेऊर हैबती ता. नेवासा यांना परत दिलेली आहे. आपल्या गहाळ झालेल्या वस्तु व
मोबाईल फोन परत मिळाल्याने सौ. मिरा नारायण खराडे व त्यांचे पती नारायण बाळासाहेब खराडे हे
अतिशय खुष व आनंदी झाले व त्यांनी नेवासा पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक व ईतर पोलीसांचे आभार
मानले आहेत