
*आषाढी एकादशीला कुर्बानी देणार नाही! नेवाशात मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय*.
संतोष औताडे- मुख्य संपादक – नेवासा दिनांक -24/06/2023
*शांतता कमिटीच्या बैठकीत एकमुखी निर्णय*
नेवासा तालुक्यात
बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव बकरीची कुर्बानी देतात, तर आषाढी एकादशीला वारकऱ्यांचा उपवास असतो. त्यामुळे हिंदू बांधवांच्या भावनांचा अवमान होऊ नये व २९ राजी आषाढी एकदाशी तसेच याच दिवशी मुस्लीम बांधवाचा पवित्र सण बकरी ईदही आहे. त्यामुळे यंदा दोन सणांचा अनोखा संगम पाहायला मिळाला आहे हिंदू बांधवांच्या भावनांचे आदर करत नेवासा शहरातील मुस्लीम बांधवांनी यंदा बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं नेवासा शहरातून व वारकरी संप्रदायातून स्वागत होत आहे.
नेवासा पोलीस ठाण्यात शनिवार (दि.२४ ) रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकित मुस्लिम समाजाचे शहरातील सर्वच प्रमुख नेत्यांनी हि घोषणा केली
यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे बोलताना म्हणाले की नेवासा शहरात माघील काळात काही चुकीच्या गोष्टीं घडल्या आहेत अश्या प्रकरा माघे विविध समाजातील फक्त दोन टक्के लोक असतात जे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करतात या लोकांना आपणचं जागेवर आणू शकतो आषाढी एकादशी व पवित्र बकरी ईद एकाच दिवशी आहे सण उत्सव एकमेकांच्या हातात हात घालून येतात मग आपण देखील अशाच प्रकारे हातात हात घालून एकत्रितपणे सर्व सण उत्सव साजरे करावे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करा,चांगल्या कार्यात बाधा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा ईशारा यावेळी बोलतांना दिला
या प्रसंगी जातीय सलोखा समितीचे आसिफ पठाण, बहुजन चळवळीचे नेते संजय सुखदान, युवा नेते ईमरान दारुवाला, नगरसेवक राजेंद्र मापारी, जेष्ठ नेते रहेमानभाई पिंजारी,अब्बास बागवान,साईनाथ लष्करे, ऍड जावेद ईनामदार, सुलेमान मणियार, मौलाना तन्वीर,प्रेस क्लब चे अध्यक्ष मोहन गायकवाड पत्रकार रमेश शिंदे, पवन गरुड, कैलास लष्करें, यांच्या सह शांतता कमिटीचे सदस्य व शहरातील सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
—————————————————–
आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद आल्याने हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरी होणार आहेत. हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करून नेवासा शहरात हिंदू-मुस्लिम एकता नांदावी आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या वतीने कुर्बानी न देण्याचा निर्णय आज सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
आसिफ पठाण (नगरसेवक)
जातीय सलोखा समिती .
—————————————————–
आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद साजरी न करता दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे मुस्लिम समाजाने घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे .- शिवाजी डोईफोडे पोलीस निरीक्षक,नेवासा