भारत सरकारने वाहतुक व विक्रीस बंदी घातलेला 28,25,000/- रुपये किंमतीचा 5,500 किलो वजनाचा मांगुर जातीचा मासा व एक आयशर टेम्पो जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई

(संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा) पीआरओ/प्रेसनोट/ 189/2022 दिनांक :- 28/12/2022
————————-
औप्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना ü जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे, सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/रोहित मिसाळ, मपोना/भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशांना बोलावुन घेवुन पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथक तात्काळ रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेतील पथक पेट्रोलिंग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सोलापुरकडुन-अहमदनगरच्या दिशेने एक तपकिरी रंगाचे आयशर कंपनीचा निळे रंगाची ताडपत्री बांधलेला टेम्पोमध्ये बंदी असलेला मांगुर जातीचा मासा विक्री करीता घेवुन जात आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. अनिल कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन नगर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्थानिक पोलीस स्टेशन व पंचांचे मदतीने नगर सोलापुर रोडने जावुन रुईछत्तीशी शिवारातील हॉटेल सुयोग समोर सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील नमुद तपकिरी रंगाचा आयशर टेम्पो येताना दिसला पथकाची खात्री होताच टेम्पो चालकास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्याने ताब्यातील आयशर टेम्पो रस्त्याचे कडेला उभा केला. त्यावेळी टेम्पोमध्ये दोन इसम बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) दिपनकर परेश देबनाथ, वय 30 व 2) आल्लुदिन जायनाल रपतान वय 36, दोन्ही रा. बिथारी नॉर्थ 24, परगनस, राज्य पश्चिम बंगाल असे असल्याचे सांगितले. त्यांना टेम्पोमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीस समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यांना अधिक विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस करता त्यांनी टेम्पोमध्ये मांगुर जातीचा जिवंत मासा असुन तो सोलापुर येथील शेततळ्यातुन काढुन टेम्पोमध्ये भरुन मध्यप्रदेश येथील इंदौर येथे घेवुन जात असले बाबत माहिती दिल्याने दोन्ही संशयीतांना ताब्यात घेतले व मा. सहाय्यक मत्सविकास अधिकारी, अहमदनगर यांना संपर्क करुन ताब्यातील माश्याबाबत अभिप्राय देणे विषयी कळविले. त्यांनी लागलीच घटना ठिकाणी येवुन टेम्पोमधील माश्याची पाहणी करुन सदर मासा हा मांगुर जातीचा असुन नमुद मांगुन जातीचे माश्यापासुन भारतीय माशांचे प्रजातीला व पर्यावरणाला धोका असुन मत्सपालन, विक्री व वाहतुकीस बंदी आहे असा अभिप्राय दिला व एक मांगुर जातीचा मासा पुढील तपासणी करीता सॅम्पल म्हणुन काढुन घेतल्याने दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन 8,25,000/- रुपये किंमतीचा 5,500 किलो वजनाचा मांगुर जातीचा मासा व 20,00,000/- रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो असा एकुण 28,25,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन दोन्ही आरोपी विरुध्द पोना/1372 संतोष शंकर लोढे, ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 885/2022 भादविक 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.