गुन्हेगारी
Trending

अहमदनगर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

·संतोष औताडे (मुख्य संपादक – नेवासा ) दिनांक-30/10/2022


सविस्तर माहिती- , यातील फिर्यादी शिवाजी अर्जुन साबळे , वय ४० रा . इंदिरानगर , भिंगार , अहमदनगर यांची होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक एम . एच . २० – ई झेड- ५१०१ ही सिव्हील हॉस्पीटल , अहमदनगर पार्किंगमधुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेलेवरुन दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरबाबत तोफखाना पो.स्टे . गुरनं ९ १२ / २०२२ भादविक ३७ ९ प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होतो . सदर गुन्हयाचे तपासाबाबत मा . पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांनी जिल्हयामध्ये मोटार सायकल चोरीचे प्रकार वाढत असल्याने गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करून गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये मा . श्री . अनिल कटके साो . पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , इसम नामे ( १ ) संदीप उर्फ पिंटया पांडरंग खेडकर व त्याचा साथीदार ( २ ) सागर उर्फ पप्पू वसंत गिते असे काळया रंगाच्या स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम.एच .२० ई झेड ५१०१ या चोरीच्या मोटार सायकलवरुन पाथर्डीवरुन अहमदनगर कडे येत आहेत . अशी खात्रीशिर बातमी मिळाल्यान त्यांनी सदर माहिती सपोनि श्री . दिनकर मुंडे यांना सांगून स्टाफसह जाऊन खात्री करुन कारवाई करणेबाबतचे आदेश दिल्याने सपोनि / दिनकर मुंडे , सफौ / मनोहर शेजवळ , पोहेकॉ / बापूसाहेब फोलाणे , पोना / शंकर चौधरी , दिलीप शिंदे , भिमराज खर्से , पोकॉ / योगेश सातपुते , पोकॉ / विनोद मासाळकर , चापोहेकॉ / संभाजी कोतकर अशांनी नगर पाथर्डी रोडवरील चॉदबीबी महाल पायथ्याशी सापळा लावून थांबलो असता पाथर्डी कडुन अहमदनगरकडे दोन इसम बातमीतील नमुद वर्णनाच्या मोटार सायकलवरुन येत असल्याची खात्री झाल्याने जवळ येताच आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता आम्हास पाहुन ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांनाच आम्ही त्यांना १३/०० वा . जागेवरच पकडले . आम्ही त्यांना आमची ओळख सांगून त्यांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे ( १ ) संदीप उर्फ पिंटया पांडरंग खेडकर वय ४ ९ रा . घाटशिळ पारगांव , शिरूर कासार , ता . शिरुर , जि . बीड ( २ ) सागर उर्फ पप्पू वसंत गिते वय २३ रा . लोहसर खांडगांव , ता . पाथर्डी , जि . अहमदनगर असे असल्याचे सांगितले . त्यांचेकडे त्यांचे ताब्यात असलेल्या मोटार सायकलचे कागदपत्र व ड्रायव्हींग लायसनबाबत विचारपूस करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले . त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी करता त्यांनी कळविले की , आम्ही दोघांनी सदरची मोटार सायकल ही सिव्हील हॉस्पीटल , अहमदनगर आवारातून चोरी केलेली आहे व त्यांनी अहमदनगर शहरातून व परीसरातून आणखी ०७ अशा एकुण ०८ मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले. सदरची कारवाई बीी जीशेखर साहेब पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेञ , राकेश ओला साहेब पोलिस अधीक्षक अहमदनगर,  स्वाती भोर  मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , संजय सातव उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे