शेतावरील ईलेक्ट्रीक मोटार केबल वायर चोरी करणारी सराईत आरोपींची टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.-

संतोष औताडे- मुख्य संपादक क्रमांक पीआरओ/प्रेसनोट/120/2023 प्रेस नोट दिनांक :-19/06/2023
————————————————-
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी, दिनांक 07/06/23 रोजी फिर्यादी श्री. प्रदीप छगन नागवडे वय 35, रा. गुणवडी, ता. नगर यांचे व आजु बाजूचे शेतक-यांचे विविध कंपनीचे 31,400/- रुपये किंमतीची ताब्याचे धातुची इलेक्ट्रीक मोटार केबल वायर कोणीतरी अज्ञात चोरट्याचे स्वत:चे आर्थिक फायद्या करीता चोरुन नेली होती. सदर घटने बाबत नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.482/2023 भादविक 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना चोरीचे ना उघड गुन्हे उघडकीस आणणे करीता पथक नेमुण समांतर तपास करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, पोना/रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोकॉ/शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, सागर ससाणे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन चोरी करणारे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले. पथक राहुरी परिसर फिरुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर स्थागुशा यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे आकाश बर्डे रा. कुरणवाडी, बारगांव नांदुर, ता. राहुरी याने वरील प्रमाणे दाखल गुन्हा साथीदारासह केला असुन तो त्यांचे गांवी आला आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. पथक तात्काळ कुरणवाडी, बारगांव नांदुर, ता. राहुरी येथे जावुन संशयीत इसम नामे आकाश बर्डे याचे वास्तव्या बाबत माहिती घेवुन घरा जवळ जावुन सापळा लावुन थांबलेले असताना घरा बाहेर बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम उभा असलेला दिसला त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यातील इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव 1) आकाश गोरख बर्डे वय 24, रा. कुरणवाडी, बारगांव नांदुर, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार नामे सारंग बर्डे रा. गुणवडी, ता. नगर, नवनाथ ऊर्फ वीर पवार (फरार) साईनाथ पवार (फरार), शक्तीमान गायकवाड (फरार), सोमनाथ गायकवाड, (फरार) व अरुण बर्डे (फरार) अ.क्र. 3 ते 7 रा. गुणवडी, ता. नगर अशांनी मिळुन केल्याची कबुली दिल्याने त्यांचा शोध घेता आरोपी नामे सागर गुलाब बर्डे हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 2) सागर गुलाब बर्डे वय 24, रा. गुणवडी, ता. नगर असे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यातील चोरी केलेली केबल वायर जाळुन त्यातील तांबे बेलापुर, ता. श्रीरामपूर येथील जमील शहा (भंगार दुकानदार) यास वेळोवेळी विक्री केल्याची माहिती दिल्याने इसम नामे 3) जमील इब्राहिम शहा, वय 44, रा. वॉर्ड नं.2, ता. श्रीरामपूर याचे भंगाराचे दुकानात जावुन विचारपुस करता त्याने केबल वायर आरोपींकडुन भंगारात घेतल्याची कबुली दिल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीस अधिक विश्वासात घेवुन आणखी कोठे कोठे व किती ठिकाणी चोरीचे गुन्हे केले याबाबत विचारपुस करता त्यांनी नगर तालुका, घारगांव व पारनेर परिसरात इलेक्ट्रीक मोटारची केबल वायर चोरी केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे एकुण 4 गुन्हे उघडकिस आले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. नगर तालुका गु.र.नं. 482/2023 भादविक 379
2. नगर तालुका गु.र.नं. 101/2023 भादविक 379
3. घारगांव गु.र.नं. 283/2023 भादविक 379
4. पारनेर गु.र.नं. 503/2023 भादविक 379
ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन ईलेक्ट्रीक मोटार केबल वायर मधील 31,400/- रुपये किंमतीचे तांबे मिळुन आल्याने आरोपींना नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपीचे इतर फरार साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.
आरोपी नामे आकाश गोरख बर्डे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे जबरी चोरी व दारुबंदी कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. राहुरी 582/21 भादविक 392, 34
2. राहुरी 207/21 म.प्रो.का.क. 65 (ई)
आरोपी नामे सारंग गुलाब बर्डे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द नगर तालुका पोलीस स्टेशन येथे चोरीचा एक गुन्हा दाखल आहेत तो खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. नगर तालुका 65/19 भादविक 379
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. संपतराव भोसले साहेब, नगर ग्रामिण विभाग व श्री. सोमनाथ वाकचौरे साहेब, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे