नेवासा फटा ते भेंडा रोडवरील सौंदाळा हद्दीत धुम स्टाईल ने महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडले.
(संतोष औताडे- मुख्य संपादक ,नेवासा ) दिनांक 05/12/2022
नेवासा फटा ते भेंडा रोडवरील सौंदाळा हद्दीत धुम स्टाईल ने महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडले.
सविस्तर माहिती- सौंदाळा गावाच्या हद्दीत मोटारसायकल वरुन धूम स्टाईलने आलेल्या दोघांनी प्राध्यापिकेच्या गळ्यातील गंठण हिसका मारुन चोरुन नेल्याची घटना नेवासाफाटा ते भेंडा दरम्यान सौंदाळा गावच्या शिवारात घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरी भागात धुम स्टाईल ने चोरीचे प्रकार ऐकायला मिळत होत्या परंतु आता खेड्यात सुध्दा अशा प्रकारच्या चोरी मुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सौंदाळा शिवारात धूम स्टाईलने प्राध्यापिकेच्या गळ्यातील गंठण चोरले
याबाबत ज्योती सुभाष काळे (वय 32) रा. भेंडा बुद्रुक यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी भेंडा येथील जिजामाता कॉलेजला प्राध्यापक म्हणून नोकरीला आहे. शनिवार 3 डिसेंबर रोजी कॉलेज सुटल्यानंतर मी दुपारी दोन वाजण्याचे सुमारास नेवासा फाटा, नेवासा येथे हॉस्पिटलला व माझे शेजारी राहणारी अलका केशव घोडके यांना सोबत घेवून माझी अॅक्टीव्हा (एम एच 16 सीएन 9813) गाडीवर गेले होते.
आम्ही आमचे काम आवरुन नेवासा फाटा ते भेंडा रोडने भेंडा गावाकडे येत असताना सौंदाळा गावाचे शिवारात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आठरे यांचे हॉटले जयराजश्रीचे समोरील रस्त्यावर आमचे पाठीमागून आलेल्या तोंडाला काळे मास्क घातलेल्या तरुणांनी माझे गळ्यातील 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण हिसका मारुन तोडून घेवून बळजबरीने चोरुन नेले आहे. या फिर्यादीवरुन दोघा अज्ञात तरुणांवर 1107/2022नुसार भा.द.वि.क 392 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यत आला असुन पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत.