गुन्हेगारी
Trending

अहमदनगर येथे चोरी करणारी सराईत आतंरजिल्हा टोळी 6,36,643/- (सहालाख छत्तीस हजार सहाशे त्रेचाळीस) रु.किंचे सोलार मोटार पंप युनिट व टेम्पोसह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) क्रमांक पीआरओ /प्रेसनोट /160/2022  दिनांक :-15/11/ 2022

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 08/11/2022 रोजी एमआयडीसी अहमदनगर येथुन फिर्यादी श्री. विजय पोपट घोरपडे वय 40, धंदा ट्रान्सपोर्ट, रा. माऊली बंगला, विद्या टॉवर शेजारी, नगर कल्याण रोड, अहमदनगर यांनी एमआयडीसी येथील प्लॉट नं. 19 जवळ लावलेला मालवाहतुक टेम्पो अज्ञात इसमांनी चोरी करुन नेला होता. तसेच त्याच रात्री फिर्यादी श्री. विजयसिंग गुरदिपसिंग सॅम्बी, वय 65, धंदा कंपनी व्यवसाय, रा. डॉक्टर्स कॉलनी, बुरुडगांव रोड, अहमदनगर यांचे कंपनीतील सोलार मोटार पंप, कंट्रोलर व केबल असा दोन्ही गुन्ह्यातील मिळुन एकुण 7,45,024/- रु. किंमतीचा मुद्देमाल अज्ञात इसमांनी फिर्यादीचे संमती शिवाय लबाडीचे इराद्याने स्वत:चे आर्थिक फायद्या करीता चोरुन नेला होता. सदर घटने बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अनुक्रमे 1) गु.र.नं. 859/2022 भादविक 379 व 2) गु.र.नं. 860/2022 भादविक 379 प्रमाणे चोरीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/ श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदर दोन्ही ना उघड गुन्ह्यांचा समांतर तपासा करणे करीता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, पोना/शंकर चौधरी, भिमराज खर्से, लक्ष्मण खोकले, दिपक शिंदे, पोकॉ/योगेश सातपुते, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, मयुर गायकवाड, चापोहेकॉ/संभाजी कोतकर, अर्जुन बडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन दोन्ही ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास लागलीच रवाना केले.
पथक अहमदनगर शहर व एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करुन आरोपींची माहिती घेत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे शुभम खोत हा साथीदारासह एका चोरीच्या टेम्पोमध्ये एमआयडीसी येथील गोडावुन मधुन चोरलेला माल भरुन नगर औरंगाबाद रोडने जात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. नमुद आदेशा प्रमाणे पथक वाहनातुन नगर औरंगाबाद रोडने जात असतांना जेऊर गांवचे शिवारात बातमीतील नमुद टेम्पोमध्ये मागिल बाजुस काही वस्तु झाकुन व एक मोटार सायकल घेवुन जातांना दिसला. टेम्पोस ओव्हरटेक करुन गाडी आडवी लावुन थांबविले असता टेम्पोमध्ये बसलेले तीन इसम पथकास पाहुन पळुन जावु लागले. त्यांचा शिताफीने पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले व पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) शुभम महादेव खोत, वय 25, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जिल्हा औरंगाबाद, हल्ली रा. राज हॉटेल, वनराई कॉलनी, एमआयडीसी, अहमदनगर 2) अक्षय बंडु कु-हाडे, वय 24, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जिल्हा औरंगाबाद, हल्ली रा. वैदुवाडी, भिस्तबाग, सावेडी, अहमदनगर 3) राहुल भाऊसाहेब नेटके, वय 20, रा. देवगाव, ता. नेवासा, हल्ली रा. मनोरमा कॉलनी, नागापुर, एमआयडीसी अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे टेम्पो व त्यामधील मालाबाबत विचारपुस करता त्यांनी सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यामुळे पोनि/श्री. अनिल कटके यांचा संशय बळावल्याने त्यांनी ताब्यातील संशयीतांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने तपास करता त्यांनी एमआयडीसी येथुन टेम्पो चोरी केला असुन त्यामध्ये एमआयडीसी येथील गोडावुन मधुन चोरी केलेल्या मोटार कंट्रोलर व केबल घेवुन जात आहे अशी कबुली दिली.
ताब्यातील आरोपींनी दिलेल्या कबुलीचे अनुषंगाने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील गुन्हे अभिलेख पडताळणी करुन खात्री केली असता वरील प्रमाणे दाखल दोन गुन्हे 1) गु.र.नं. 859/2022 भादविक 379 व 2) गु.र.नं. 860/2022 भादविक 379 असुन दोन्ही गुन्हे उघडकिस आले आहेत.
ताब्यातील तीनही आरोपींना 6,36,643/- रु. किंमतीचा सोलार मोटार पंप युनिट त्यामध्ये कंट्रोलर, केबल बंडल व एक मालवाहु टेम्पो जप्त करुन मुद्देमालासह एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी नामे शुभम महादेव खोत यांचे विरुध्द विविध पोलीस स्टेशनला जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण -04 गुन्हे दाखल आहेत. ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.
1. एमआयडीसी वांळुज , जिल्हा औरंगाबाद 837/2021 भादविक 379, 411, 34
2. सातारा पोस्टे, जिल्हा औरंगाबाद 323/2021 भादविक 379
3. करमाड पोस्टे, जिल्हा जालना 373/2021 मपोका 124
4. अंबड पोस्टे, जिल्हा जालना 09/2022 भादविक 394, 34
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, अतिरीक्त कार्यभार अहमदनगर, श्री. अजीत पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे