दिवाळीच्या तोंडावर नेवासा तालुक्यातील नागरिकांनी पकडला अवैध रेशन साठा.मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता.

संतोष औताडे (मुख्य संपादक- नेवासा ) दिनांक-25/10/2022
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील नागरिकांनी अवैध रेशन साठा पकडून दिल्या ची घटना उघडकीस आली आहे. नेवासा तालुक्यात रेशनिंगचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराचे भानसहिवरे गावात गोडाऊन आहे. याच गोडाऊन मध्ये अवैधरित्या गहू आणि तांदूळ साठवून ठेवला होता. याची माहिती काही स्थानिक ग्रामस्थांना मिळाली होती ग्रामस्थांनी त्या ठिकाणी जाऊन गाडीमध्ये भरून जाणारे सुमारे १५७ तांदळाचे कट्टे पकडले. नंतर गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला गहू आणि तांदूळ त्यांना सापडला.
ऐन दिवाळीमध्ये एवढा मोठा रेशनचा साठा हा काळा बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला होता. मात्र ग्रामस्थांनी हा माल पकडतात पुरवठा दराने त्या ठिकाणी काही गुंडांना पाठवून माल पकडून देणाऱ्या ग्रामस्थांना मारहाण केली आहे.या मारहाणीमुळे काही ग्रामस्थ जखमी झाले असून त्यांना नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या बाबत तहसीलदार सुरेशकुमार सुराणा यांना माहिती भेटल्या नंतर त्यांनी पुरवठा अधिकारी यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कारवाई सुरू होती मात्र माल कोणाचा आहे याबाबत माहिती प्रशासनाने दिली नाही.नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथे अवैधरित्या साठवून ठेवलेल्या गहू व तांदळाचा साठा शुक्रवारी नागरिकांनी पकडला होता. शनिवारी दुपारी नेवासा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक वैशाली विजयकुमार गंदीगुडे (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे..फिर्यादीवरुन तिघांवर गुन्हा रजिस्टर नंबर 904/2022 जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3,6 (क), 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी भेट देवून सदर साठ्याची पाहणी केली आहे. नेवासा तालुक्यात पुर्वी पासुन रेशनचा काळाबाजार होत असल्याची चर्चा होती. प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.