अहमदनगर शहरात तलवारी व प्राण घातक हत्यारांची विक्री करणा-या आरोपी कडुन २८,५०० / – किं. शस्त्रसाठा कोतवाली पोलीसां कडुन जप्त

संतोष औताडे (मुख्य संपादक- नेवासा) दिनांक-18/10/2022
सविस्तर माहिती- दि १८/१०/२०२२ रोजी दुपारी १४/१५ वा सुमारास पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि . अहमदनगर शहरातील आशा टॉकीज चौक येथे आरीशा कलेक्शन मध्ये अवध प्राणघातक हत्यारांची बेकायदेशीर विक्री होत आहे . अशी माहीती मिळाल्याने १४/३० वा च्या सुमारास कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथका सह छापा टाकून दुकानाची झडती घेतली असता सदर ठिकाणी इसम नामे हुमायुन उमर शेख वय ३७ वर्ष रा आशा टॉकीज चाक अहमदनगर हा मिळून आला व त्याचे दुकानात काउंटर खालील भागात खालील प्रमाणे प्राणघातक हत्यारे मिळून आले . १ ) १ ९ , ५०० / – रु कि च्या ५ मोठ्या तलवारी २ १००० / – रुकिचा फायवर मुठीचा धारदार चाकु ( ३ ) १००० / – रु किं चा मुठीतील फायटर धारदार चाकु ४ ) ७००० / – रु कि चे १४ नग धारदार चाकू एकुण २८,५०० / – किं चे प्राणघातक शञे विक्री करणे कामी स्वताच्या कबज्यात बाळगताना मिळुन आला असल्याने पोना योगश भिंगारदिवे यांच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ८२४ / २०२२ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा रजि . दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई मनोज कचरे हे करीत आहेत . सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो , मा . अप्पर पोलीस अधिक्षक श्री . सौरभ कुमार अग्रवाल सोरे , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री . अनिल कातकाडे सोो . यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे , सपोनि रविंद्र पिंगळे , सपोनि विवेक पवार , पोसई मनोज कचरे , पोहेकॉ गणेश धोत्रे . पोना योगेश भिंगारदिवे , पोना रियाज इनामदार , पोना योगेश खामकर , पोकों सुजय हिवाळे , पोकाँ अमोल गाढे , पोकाँ संदिप थोरात , पोकौं सोमनाथ राउत , पोहेकाँ सागर निपसे , पोना गोरख काळे , पोना इसराईल पठाण , पोहेकाँ सतिष भांड , पोकौं प्रशांत बोरुडे , पोकाँ सतिष शिंदे , मपोकौं हिना बागवान यांनी केली आहे.