ब्रेकिंग
Trending
अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून लैगींक अत्याचार करणा-या आरोपीस भिंगार कॅम्प पोलीसांनी केले जेरबंद

संतोष औताडे -मुख्य संपादक, दिनांक -18/06/2023
- अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून लैगींक अत्याचार करणा-यास
भिंगार कॅम्प पोलीसांनी केले जेरबंद *
फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी हीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता पळवून नेले बाबत भिंगार कॅम्प पो
स्टे गु र नं 409/2022 भा द वि कलम 363 प्रमाणे दि. 15/09/2022 रोजी गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील फिर्यादीची अल्पवयीन मुलगी व आरोपी नामे पांडूरंग हरीभाऊ जाधव वय 31 वर्षे
रा.पदमपुर वाडी,वाकोडी ता.जि. अहमदनगर यांचा गुप्त बातमीदारा मार्फत तसेच तांत्रीक विश्लेषन द्वारे शोध घेतला
असता ते बाबुर्डी शिर्के ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथे मिळून आल्याने यातील पिडीत मुलगी हिच्या जबाब वरून सदर
गुन्ह्यास भा द वि 366,376(2)(N) सह बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधि.2012 चे कलम 4,8,12 प्रमाणे
वाढीव कलम लावण्यात आले असून आरोपी म// यास सदर गुन्ह्यात अटक करून दि. 16/06/2023 रोजी मा. न्यायालया
समोर हजर केले आहे. पुढील तपास कॅम्प पोलीस करीत आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत
खैरे,मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकडे, सहा. पोलिस निरीक्षक श्री. दिनकर मुंडे, पोसई
/किरण साळुंके, पोहेकाँ/453 आर बी डोळे, पोहेकाँ/रेवननाथ दहीफळे, पोहेकाँ/संदिप घोडके, पोना/राहुल द्वारके,
पोना/दिलीप शिंदे, पोकाँ/रमेश दरेकर,पोकाँ/अमोल आव्हाड, पोका/समीर शेख, मपोना/प्रिया भिंगारदिवे यांनी
सदरची कारवाई केली आहे