महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध मागणी संदर्भात नेवासा तहसील, पोलिस स्टेशन समोर रास्ता रोको आंदोलन.

संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) दिनांक- 11/10/2022
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने विविध मागण्या साठी निवेदन देण्यात आले.
*१]नेवासा पोलिस स्टेशन पोलिस संख्या वाढविण्यात यावी..
*२]दामिनी महीला सरंक्षन पथक स्थापन करण्यात यावे.. (नेवासा सह,संपूर्ण महाराष्ट्रात 5000 नवीन महीला पोलिस भरती करण्यात यावी )
*3]नवीन तहसील कार्यालयाचे उदघाटन करून सुरू करावे व तहसील कर्मचारी संख्या वाढविण्यात यावी..
*4]नेवासा बाजारतळ येथील नवीन गाळे जे या पुर्वी तेथे पोट भरत होते त्यांनाच कमीत कमी डिपाॅझीट भरून देण्यात यावे..
*5]मा.श्री. मुख्यमंत्री साहेब यांनी ज्ञानेश्वरीची जन्मभूमी मराठी भाषेचे उगमस्थान संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर तिर्थक्षेत्र नेवासा येथे भेट देऊन पहानी करावी व संत ज्ञानेश्वर मंदिर व नेवासा शहराकरीता भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा..
*6]तिर्थक्षेत्र नेवासा येथील खोलेश्वर गणपती चौक येथील तीनपदरी रस्त्याच्या मधोमध गोल सर्कल करून भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा..
*7]खोलेश्वर गणपती चौक संत ज्ञानेश्वर मंदिर कडे जाणारा रस्ता येथे ज्ञानेश्वरीची जन्मभूमी या नावाची डोळ्यांना दिपवेल अशी भव्यदिव्य कमान उभारावी..
*8]श्री मोहीनीराज मंदिर करीता नाथबाबा चौक मोहीनीराज मंदिराकडे जाणारा रस्ता हाॅटेल अर्चना शेजारील रोड येथे भव्य कमान उभारावी..
*9]नगरपंचायत चौक तीनपदरी रस्त्या मोहीनीराज मंदिर व ज्ञानेश्वर मंदिर कडे जाणारा रस्ता येथे एक सर्कल बांधण्यात यावे..
*10]नेवासा फाटा ,खडका हाॅटेल औदुंबर शेजारील नेवासा शहराकडे येणारा रस्ता येथे भव्य दिव्य संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरची कमान उभारावी यावी..
11] मधमेश्वर मंदिराची नोंद उतार्यावर लावण्यात यावी..
12]पोलिसांना नवीन घरे बांधणे..या मागण्या मान्य व्हाव्यात या करीता आज दि.10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेवासा येथे प्रवरानदी पुलाजवळ रास्ता रोको करण्यात आला व तहसीलदार रुपेशकुमार सुराना व पोलिस निरीक्षक विजयजी करे साहेब यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात मनसे जिल्हाउपाध्यक्ष संतोष गव्हाणे, तालुका अध्यक्ष दिगंबर पवार, म.न.सहकार सेना तालुका अध्यक्ष सचिन गव्हाणे, तालुका उपाध्यक्ष दिपक परदेशी, नेवासा शहर सचिव रविंद्र पिंपळे, शहरउपाध्यक्ष नवनाथ जाधव, विद्यार्थी सेना सचिव अविनाश गाढवे, महीला जिल्हा उपाध्यक्षा सौ रंजनीताई पंडूरे पंडूरे, नेवासा तालुका महिला अध्यक्षा सौ मिराताई गुंजाळ, मनसे सैनिक सतिष लंघे, भाऊसाहेब कुटे,यश गव्हाणे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.