अहमदनगर जिल्हयात चैन स्नॅचिंग करणारा आरोपी ८,९०,००० /- रु किंमतीचे १३ तोळे ३५ मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व मोटार सायकलसह जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांची कारवाई

संंतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) दिनांक- 01/10/2022
बातमीतील हकीगत अशी की, यातील फिर्यादी शैला सिताराम पाटील रा. तारकपुर बस स्टैंड समोर अहमदनगर मैत्रीण शुभदा दिनकर कुलकर्णी रा. खंडेलाल भवनाजवळ चैतन्यनगर येथे त्याच्या घरी आमचा मासिक भीसी कार्यक्रमला चालले होते तेव्हा फिर्यादी व फिर्यादी याची मैत्रीण आमच्या दोघीच्या मधुन जॉगीग पार्क कडे जाताना एक अनोळखी इसमाने माझ्या गळयातील वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने तोडुन ओढुन नेले व त्याच्या बरोबर असलेल्या दुस-या अनोळखी मित्रासोबत मोटार सायकलवर बसुन निघुन गेला आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि.दाखल करण्यात आला आहे. सदरबाबत तोफखाना पो.स्टे. गुरनं ८०२ / २०२२ भादविक. ३९२.३४ प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे तपासाबाबत मा. श्री. मनोज पाटील साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्हयामध्ये चैनस्नॅचिंगचे प्रकार वाढत असल्याने गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री. अनिल कटके, पोसई/ सोपान गोरे, सफी. मनोहर शेजवळ, पोहेकॉ / सुनिल चव्हाण, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, विजयकुमार वेठेकर, पोना/शंकर चौधरी, भिमराज खसे, विशाल दळवी, मच्छिद्र बर्डे, दिलीप शिंदे, पोकों/रणजित जाधव, विजय धनेधर, योगेश सातपुते, आकाश काळे, मपोना. भाग्यश्री भिटे, मपोकॉ. ज्योती शिंदे, चापोहेकॉ संभाजी कोतकर, उमाकांत गावडे अशांनी संशयीत आरोपींची माहिती घेत असतांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन संशयित इसम लाल रंगाचे पल्सर मोटार सायकलवरुन केडगांव बायपास रोडने मनमाडकडे जात आहेत. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी पोसई श्री. सोपान गोरे व पोलीस अंमलदार यांना तात्काळ बोलावून घेऊन सदर बातमीतील हकिगत कळवून कारवाई करणेबाबत आदेश दिला. त्यावरुन वरील पोलीस अधिकारी व अंमलदार असे खाजगी वाहनाने केडगांव बायपास येथे सापळा लावून थांबले असतांना थोडयाच वेळात बातमीतील लाल रंगाची पल्सर मोटार सायकलवरुन मिळालेल्या माहिती प्रमाणे दोन संशयित इसम येतांना दिसले. सापळा पथकातील पोलीस अधिकारी व
अंमलदार यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता मोटार सायकल चालकाने गाडीचा वेग कमी करताच मागे बसलेला इसम उडी मारुन पळून गेला. त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आला नाही. तसेच मोटार सायकल चालकास मोटार सायकलसह ताब्यात घेऊन त्यास त्याचे नांव पत्ता विचारता असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलीस पथकाने त्यास पोलीस असल्याचे सांगून अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे नांव व वय सांगितल्याने तो अल्पवयीन असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याची सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्याने अहमदनगर जिल्हयात पारनेर, राहुरी, तोफखाना, राहाता, लोणी, श्रीरामपूर, कोपरगांव येथे त्याचे साथीदाराचे मदतीने मोटार सायकलवरुन येऊन महिलांचे गळयातील मंगळसूत्र चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यावरून अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. (१) तोफखाना पो.स्टे. ८०२/२०२२ भादविक.३०९,३४, २) राहुरी पो.स्टे. ८३८ / २०२२ भादविक. ३९४, ३४ ३) पारनेर पो.स्टे. ६४६ / २०२२ भादविक. ३९२, ३४ ४) कोपरगांव शहर पो.स्टे. २३४/२०२२ भादविक. ३९२, ३४ ५) राहुरी पो.स्टे. ४९७/२०२२ भादविक. ३९४ ६) लोणी पो.स्टे. २३९/२०२२ भादविक. ३९२, ३४ ७) राहाता पो.स्टे. २४५/२०२२ भादविक. ३९४, ३४ ८) श्रीरामपूर शहर पो.स्टे. ६१४/२०२२ भादविक. ३९४ वरील प्रमाणे ०८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदर गुन्हयात जबरी चोरी झालेला मुद्देमाल कौशल्यपूर्ण तपासकरुन ६,८०,०००/-रुपये किंमतीचे १३ तोळे ३५ मिलीग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण ८,१०,०००/- रु. (आठ लाख दहा हजार रुपये) किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करीता तोफखाना पोलीस ठाणे गुरनं ८०२ / २०२२ भादविक. ३९२, ३४ चे तपासकामी हजर केले आहे.
सदरची कारवाई मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील साो. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा. श्री. मनोज पाटील साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभ कुमार आग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली