शाळेतील मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा.. नागरिकांनी अफवांवर विश्र्वास ठेवू नये. पोलिसांचे आवाहन

संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) दिनांक-25/09/2022
शाळेतील मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा.. नागरिकांनी अफवांवर विश्र्वास ठेवू नये. पोलिसांचे आवाहन
सविस्तर माहिती- सध्या हॉटस्अप, फेसबुक वर शालेय मुलांना पळवणारी टोळी आली असल्याची अफवा पसरली आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषयी (संतोष औताडे- संपादक अहमदनगर पोलिस स्टाइम्स न्युज) यांनी मनोज पाटील साहेब पोलिस अधीक्षक अहमदनगर यांचा सोबत या विषयावर चर्चा केली असता त्यांनी सांगितले हि अफवा असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यामध्ये लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा जुने काही व्हिडिओ आणि छायाचित्रांमधे तोडफोड करून समाज माध्यमावर संदेश पसरवून जनतेमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्यात येत आहे . याद्वारे जनतेस आवाहन करण्यात येते की , याबाबत पोलीस सतर्क असून कोणतीही परिस्थिती हाताळण्याची तयारी करण्यात आली आहे . अशा कुठल्याही प्रकारची टोळी सक्रिय झालेली नाही . जर आपल्या परिसरामध्ये कोणी संशयित मिळून आल्यास त्यास कुठल्याही प्रकारची मारहाण न करता पोलिसांशी संपर्क साधावा . जर एखाद्या व्यक्तीस मारहाण झाली तर आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते . अशा प्रकारचे प्रसारित होणारे संदेश आपण फॉरवर्ड करू नयेत अगर वायरल करू नये . असे संदेश जाणीवपूर्वक वायरल केल्यास आपणाविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल . वरील कारणामुळे कोणीही घाबरून न जाता जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा नियंत्रण कक्षात संपर्क करावा . पोलीस नियंत्रण कक्ष अहमदनगर दूरध्वनी क्रमांक 0241-2416132 / डायल 112 हेल्प लाईन या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन अहमदनगर पोलिसांनी केले आहे.